रेव्ह पार्टी: पबवर छापा, कोकेन जप्त; सेलिब्रिटींच्या मुलांसह १४२ जण ताब्यात

या पार्टीमध्ये टॉलिवूडशी संबंधित काही लोक आणि सेलिब्रिटींच्या मुलांचा समावेश आहे.
Hyderabad Raid
Hyderabad RaidTwitter/@ANI

हैदराबाद - हैदराबादमध्ये (Hyderabad) एका मोठ्या रेव्ह पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 142 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात अनेक बड्या सेलिब्रिटींच्या मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी (Police) रविवारी पहाटे हैदराबादमधील फाइव्ह स्टार हॉटेलच्या पबवर छापा टाकून घटनास्थळावरून अमली पदार्थ जप्त केले आहे.

हे देखील पहा -

याबाबाद अधिकाऱ्यांनी सांगितले की, पबमध्ये पार्टी करणाऱ्या 142 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात आली. या पार्टीमध्ये टॉलिवूडशी संबंधित काही लोक आणि सेलिब्रिटींच्या मुलांचा समावेश आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून कोकेन आणि इतर मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

टॉलिवूड अभिनेता नागा बाबूची मुलगी आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला आणि गायक राहुल सिप्लीगंज हे देखील पार्टीत उपस्थित होते. पार्टी करताना आढळलेल्यांमध्ये आंध्र प्रदेशच्या माजी पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आणि तेलगू देसम पार्टी (टीडीपी) अधिकाऱ्याचा समावेश होता.

Hyderabad Raid
...तर त्यांचा नंबर राजकारणात ‘ढ’ पेक्षा खाली; संदीप देशपांडेंच्या टीकेला राऊतांचं उत्तर

मुलगी निहारिका कोनिडेलाला पबमध्ये ताब्यात घेतल्यानंतर नागा बाबूची प्रतिक्रिया

दरम्यान, नागा बाबूने एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची मुलगी निहारिका तिथे उपस्थित असली तरी तिने काहीही चुकीचे केले नाही. यात तिची काही चूक नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. निर्धारित वेळेनंतरही पब सुरु ठेवल्याने पोलिसांनी व्यवस्थापनावर कारवाई केली. तथापि, पोलिसांनी पुष्टी केली आहे. या पबमधून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही.” असे नागा बाबूने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com