Nipah Virus News : कोरोनानंतर घातक निपाह व्हायरसचा धोका, केरळमध्ये दोघांचा मृत्यू; अलर्ट जारी

Nipah News : कोझिकोड जिल्ह्यात निपाहच्या संसर्गामुळे दोन संशयित मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे.
NIPAH virus
NIPAH virusSaam TV

Nipah Viral :

कोरोना व्हायरसच्या प्रकोपातून जग आणि भारत आता बऱ्यापैकी सावरला आहे. कोरोनाची भीती आता समूळ नष्ट झाली आहे. मात्र नव्या संकटाने आता डोकं वर काढलंय. केरळमध्ये निपाह व्हायरसच्या फैलावाची भीती पुन्हा एकदा सतावू लागली आहे.

कोझिकोड जिल्ह्यात निपाहच्या संसर्गामुळे दोन संशयित मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतलाय. (Latest Marathi News)

संशयास्पद मृत्यूची नोंद झाली आहे. दोन जणांना निपाह व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतांपैकी एकाच्या नातेवाईकांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 2018 आणि 2021 मध्‍येही कोझिकोड जिल्‍ह्यात निपाह व्हायरसच्‍या संसर्गामुळे मृतांची नोंद झाली होती. (Health Tips)

NIPAH virus
Spanich Rice Recipe :मुलांना पालक खायला आवडत नाही? पौष्टिक आणि चविष्ट पद्धतीने ट्राय करा पालक भात, पाहा रेसिपी

निपाह व्हायरस कसा पसरतो?

WHOच्या म्हणण्यानुसार, निपाह व्हायरसचा संसर्ग प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो आणि दूषित अन्नाद्वारे किंवा थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेले लोकांना श्वसनाचे आजार आणि घातक एन्सेफलायटीस यासह विविध प्रकारचे रोग पसरवू शकतात.

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या शास्त्रज्ञांनी निपाह विषाणूसंदर्भात केलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात 10 राज्यांत हा व्हायरस पसरत आहे.

NIPAH virus
Sugar Price Hike: साखरेच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; सणासुदीच्या आधीच मिठाईचा गोडवा आटला

निपाह व्हायरसची लक्षणे

निपाह व्हायरस अत्यंत घातक आहे. या व्हायरसचा संसर्ग झाल्यास २४ ते ४८ तासात रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. सुरुवातील रुग्णांना श्वसनाचा त्रास जाणवतो. काही रुग्ण असेही आहेत ज्यांना न्यूरो संबंधित आजारांचे लक्षणे दिसून येतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com