Kerala : निपाह विषाणूचा परत कहर, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु

जिवघेण्या निपाह विषाणूची लागण झालेल्या केरळ मधील 12 वर्षीय मुलाचा मृत्यु
Kerala : निपाह विषाणूचा परत कहर, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु
Kerala : निपाह विषाणूचा परत कहर, 12 वर्षीय मुलाचा मृत्युSaam Tv

Nipah virus : जिवघेण्या निपाह विषाणूची Nipah virus लागण झालेल्या केरळ Kerala मधील 12 वर्षीय मुलाचा मृत्यु Death झाला आहे. या ठिकाणी कोझिकोड Kozhikode रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. केंद्र सरकारने Central Government राष्ट्रीय रोग नियंत्रण पथक National Centre for Disease Control – NCDC केरळला तात्काळ पाठविण्यात आले आहे. केरळ सरकारकडून या पथकाला योग्य त्याप्रकारची मदत पुरवली जाणार आहे.

३ सप्टेंबर दिवशी १२ वर्षीय निपाह संशयित मुलगा कोझिकोड रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्याच्या मेंदूला सूज देखील आलेली आणि ह्दयस्नायूचा दाह असा त्रास होता. आज सकाळी त्या १२ वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची माहिती केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे. कोझिकोड या ठिकाणी उद्भवलेली परिस्थिती हाताळण्याकरिता पथक नेमण्यात आल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज Vina George यांनी दिली आहेत.

हे देखील पहा-

निपाह विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्यांचा शोध घेत त्यांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तसेच संपर्कातील लोकांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे. यावर काम देखील सुरु करण्यात आले आहे. निपाह विषाणू आढळला म्हणून घाबरुन जाण्याची गरज नाही. पण आपण सावधगिरी बाळगायला हवी, असे विना जॉर्ज म्हणाले आहेत.

निपाहची लागण झालेल्या १२ वर्षीय मुलाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील अथवा इतरांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाही. कोझिकोड या ठिकाणी परिस्थितीचा आढवा घेण्याकरिता आज जाणार आहे. त्यांच्यासोबत मंत्री पीए मोहम्मद रियास असणार आहेत. अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी सांगितली आहे. निपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो.

हा विषाणू माणसांकरिता खूप धोकादायक समजला जातो. एनआयएने ANI यासंदर्भात शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. एनआयएच्या दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत निपाह विषाणूचा ४ वेळा उद्रेक झाला आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. शिवाय या विषाणूची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता १ ते २ टक्के असते, पण निपाह विषाणूची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ६५ ते १०० टक्के असते.

Kerala : निपाह विषाणूचा परत कहर, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु
Nipah virus : महाबळेश्वरच्या गुहेत आढळला निपाह विषाणू

यामुळेच या विषाणूचा धोका सर्वात जास्त आहे. मे २०१८ मध्ये केरळ राज्यात निपाह विषाणूचा प्रसार झाल्याचे बघायला मिळाले होते. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता. शिवाय राज्याच्या सीमा केरळ मधील लोकांकरिता बंद करावे लागले होते. केरळ मध्ये निपाह विषाणूने आपले भयानक रुप धारण केलेलं दाखवले होते. २०१८ मध्ये केरळ मधील १८ जणांना निपाह विषाणूची लागण झाली होती. त्यापैकी १७ जणांच्या मृत्युची नोंद करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com