Nipah Virus : निपाह व्हायरस कोरोनासारखाच पसरणार का? केंद्र सरकार का सक्रीय झाले?

Nipah Virus Kerala : केरळमधील लोकांना झपाट्याने संक्रमित करणाऱ्या जीवघेण्या विषाणूबाबत राज्य सरकारनंतर केंद्र सरकारही सक्रिय झाले आहे.
Nipah Virus Kerala
Nipah Virus KeralaSaam Tv

Nipah Virus Kerala :

Nipah Virus Kerala : WHO नं यावर्षी जागतिक महामारीच्या यादीतून कोरोनाला काढलंय. दोन वर्षांनंतर जीवन पूर्वीसारखे रुळावर आले आहे. पण त्याचदरम्यान निपाह व्हायरसमुळे लोकांच्या मनात पुन्हा भीती निर्माण झालीय. केरळमधील लोकांना झपाट्याने संक्रमित करणाऱ्या जीवघेण्या विषाणूबाबत राज्य सरकारनंतर केंद्र सरकारही सक्रिय झाले आहे. केंद्र सरकारला या विषाणूबाबत कोणताही धोका घ्यायचा नाहीये.(Latest News )

यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक आरोग्य विभागाची टीम केरळमध्ये पाठवलीय. दरम्यान केरळमध्ये या निपाहामुळे २ जणांचा मृत्यू झाल्यानं निपाह सुद्धा कोरोनाप्रमाणे देशभरात पसरेल का अशी भीती लोकांना वाटत आहे? पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत निपाहाची लागण झालेल्या एका २४ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आलीय. दरम्यान या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलीय.

दरम्यान केरळमधील एका जिल्ह्यातील ५ रुग्णांवर निपाहाचे उपचार चालू आहेत. तर २ जणांचा मृत्यू झालाय. यात ९ वर्षाचा मुलांचा आणि त्याचा २५ वर्षीय दाजीचा समावेश आहे. दरम्यान अजून ११ नमुन्यांच्या चाचणीच्या रिपोर्टची वाट अधिकारी पाहत आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या ७८९ वर पोहोचलीय. तिरुवनंतपुरममध्ये सीएम पिनाराई विजयन यांनी जिल्हाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्याचे आदेश दिलेत. जिल्ह्यात २४ सप्टेंबरपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यास आणि मास्क घालणं अनिवार्य करण्याचे आदेशही दिलेत.

जिल्हाधिकारी ए गीता यांनी सांगितले की, १३ जणांना मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४ जण अतिदक्षता विभागात आहेत. रुग्णालयात ७५ विलगीकरणाचे कक्ष उभारण्यात आलेत. रुग्णालयांमध्ये आयसोलेशनची सुविधा वाढवण्याची व्यवस्थाही करण्यात आलीय. बुधवारी कंटेनमेंट झोनची संख्या ४३ वरून ५८ करण्यात आलीय. कंटेनमेंट झोनमध्ये येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे.

या प्रकरणांमध्ये सतत होणारी वाढ आणि नुकतेच झालेले दोन मृत्यू यामुळे केंद्र सरकार सक्रीय झाले आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच WHOने कोरोनाला जागतिक महामारीच्या यादीत काढल्यामुळे दिलासा मिळालाय. केंद्र सरकारला याची माहिती आहे. दरम्यान २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे देशाची काय स्थिती झाली होती हे सर्वांना माहितीये. कोविडमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला होता. अशा परिस्थितीत आणखी एका व्हायरसने तोच प्रकार होऊ नये, त्यामुळे केंद्र सरकारने आरोग्य तज्ज्ञांचे पथक केरळमध्ये पाठवलं आहे.

Nipah Virus Kerala
Nipah Virus Update : केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका वाढला; ५ जिल्ह्यामध्ये अलर्ट, मास्क लावण्याच्या सूचना

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com