Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली जाहीर माफी, ४०० कोटी खर्च केले तरी रस्त्याचे काम निकृष्ट

रखडलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याची सूचना देखील अधिकार्‍यांना करण्यात आली.
Nitin Gadkari, Madhya Pradesh
Nitin Gadkari, Madhya Pradeshsaam tv

Nitin Gadkari Apology For Rs 400 Crore Bad Road In Madhya Pradesh : देशातील रस्ते चांगल्या दर्जाचे असावेत यासाठी नेहमीच प्रयत्नशिल असणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खराब रस्त्यांबाबत मध्य प्रदेश येथे जनतेची माफी मागितली आहे. सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करुन देखील रस्ते चांगले झाले नसल्याची खंत गडकरींनी व्यक्त केली.

जबलपूर येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (nhai) तेरा प्रकल्पांचे भुमिपूजन मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. गडकरी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी (4,054 कोटी) रुपयांच्या अंदाजे (214 किलाे मीटर) लांबीच्या आठ रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि भुमिपूनज केले. त्यावेळी मंत्री गडकरी बाेलत हाेते. (Tajya Batmya)

Nitin Gadkari, Madhya Pradesh
Satara Political News : राजेंनी मानले शंभूराज देसाईंचे आभार, त्यांच्यामुळेच आम्ही जिंकलाे !

गडकरी म्हणाले त्यांच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात (madhya pradesh) सहा लाख कोटी रुपये रस्त्यांसाठी देतील. राज्य सरकारने भूसंपादन आणि वन विभागाच्या मंजुरीसाठी गती द्यावी. विकासासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत, असेही गडकरींनी नमूद केले.

गडकरींनी (nitin gadkari) खराब रस्त्याबद्दल माफी मागितली. चारशे काेटी रुपये खर्चून बारेला ते मांडला या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या त्रेसष्ट किलाे मीटरचा टू लेन रोडवरील कामांबाबत मी समाधानी नाही असे त्यांनी नमूद केले. रखडलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याची सूचना देखील अधिकार्‍यांना करण्यात आली.

Nitin Gadkari, Madhya Pradesh
Maya Tigress Video : सुप्रिया सुळे आनंदित; बछड्यासह दिसली सेलिब्रिटी वाघीण ‘माया’ (पाहा व्हिडिओ)

जुने काम दुरुस्त करुन आणि नवीन निविदा मागवत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश गडकरींनी दिले. आतापर्यंत तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफ करा, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com