Video: नितीन गडकरींनी सांगितला असा किस्सा की उडाले हास्याचे कारंजे; म्हणाले, तेव्हापासून मी खिशात...

माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या पुस्तकाचे लोकार्पण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज इंदूरला गेले होते. लोकार्पण कार्यक्रमात त्यांनी आयुष्यातील काही रंजक रहस्ये उलगडली अन् प्रेक्षकांची हशा पिकली.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam Tv

इंदूर: माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या पुस्तकाचे लोकार्पण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज इंदूरला गेले होते. लोकार्पण कार्यक्रमात त्यांनी आयुष्यातील काही रंजक रहस्ये उलगडली अन् प्रेक्षकांची हशा पिकली. या निमित्ताने केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नेत्यांना स्वागत-सत्कारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. इंदूरमध्ये त्यांनी दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले- 'जेव्हा ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी असायची. स्वागतासाठी लोकांची फार गर्दी व्हायची. यादरम्यान त्यांचा खिसाही तीनदा-चारदा कापण्यात आला, मात्र हसू होईल या भीतीने त्यांनी हे कधीही कुणाला सांगितले नाही, कारण राष्ट्रीय अध्यक्षांचा खिसा कापणे ही काही किरकोळ गोष्ट नव्हती. त्यामुळेच आता मी कपड्यांमध्ये पैश्याचे पाकीट कधी खिशात ठेवणार नाही असा संकल्प मी मनात केला अन् हे ऐकून कार्यक्रमात हास्याचे कारंजे उडाले.

गडकरी म्हणाले- 'मला झेड प्लस सुरक्षा (Z+ Security) आहे. त्यामुळे 40 ते 50 सुरक्षा रक्षक मला घेरतात आणि चालतात. त्यामुळे लोक आता जवळही येऊ शकत नाहीत. ते म्हणाले, नेत्यांनीही दूर राहिले पाहिजे. स्वागतावेळी गळ्यात हार घालू नका, असा सल्लाही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. हा पैशाचा अपव्यय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात फक्त एकच हार घालावा, असा मजेशीर सल्ला त्यांनी दिला.

Nitin Gadkari
Facebook चे खास फीचर लवकरच होणार बंद!

त्यांनी पुन्हा उदाहरण दिल्यावर जनता हसू लागली. ते म्हणाले- 'एकदा नागपूर महापालिकेने त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामध्ये १३८ नगरसेवकांनी माझ्यावर फुलांचे हार घातले. इतके हार कुठून आले, असे मी विचारले असता ते महापालिकेच्या पैशांतून आले असल्याचे समजले आणि महापालिकेने जे बिल लावले असेल ते हारांच्या किमतीच्या कितीतरी पटीने जास्त असावे. म्हणूनच मी हार घालणे बंद केले आहे, असे किस्से त्यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com