Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनांना आग; नितीन गडकरींचा गंभीर इशारा

Nitin Gadkari On electric vehicle explosion : या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत हे सर्वात दुर्दैवी आहे.
Nitin Gadkari On electric vehicle explosion
Nitin Gadkari On electric vehicle explosionSaam Tv

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांत देशात इलेक्ट्रिक वाहनांना अचानक आग लागल्याच्या घटना घडत आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण गंभीर जख्मी किंवा अपंग झाले आहेत, शिवाय आर्थिक नुकसानही होत आहे. याबाबत आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehical) आगीच्या (Fire) घटनांबाबत आता चौकशी केली जाणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबतचे निकष कंपन्यांकडून पाळले गेले नसेल तर अशा कंपन्यांवर कडक कारवाई होणार आहे अशी माहिती गडकरींनी ट्विट करत दिली आहे. (Nitin Gadkari warns companies of 'heavy penalty' amid incidents of e-scooters catching fire)

हे देखील पाहा -

इलेक्ट्रिक वाहनं अचानक पेट (electric vehicle explosion) घेत आहेत, याबाबत गडकरी म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनेक दुर्घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत हे सर्वात दुर्दैवी आहे. या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी करण्यासाठी आम्ही तज्ञांची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारे आम्ही दोषी असलेल्या कंपन्यांनी आवश्यक ते आदेश जारी करू. त्याप्रमाणे आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करू असं गडकरी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, कोणत्याही कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास त्या कंपनीला मोठा दंड (Penalty) आकारला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत मागवण्याचे आदेशही दिले जातील असा कडक शब्दांत गडकरींनी इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन कंपन्यानी दोषपूर्ण वाहनांच्या सर्व बॅच ताबडतोब परत मागवण्यासाठी त्वरीत कारवाई करावी असं आवाहन करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे असं गडकरी म्हणाले आहेत.

Nitin Gadkari On electric vehicle explosion
EV Blast : चार्जिंगदरम्यान ई-स्कुटरच्या बॅटरीचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू!

दरम्यान, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे खप वाढत असतानाच या वाहनांच्या बॅटरीचे स्फोट होण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. २६ मार्च रोजी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाला होता. या घटनेत एक व्यक्ती आणि त्याची मुलगी ठार झाली होती.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com