Nitish Kumar : नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार

नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडून महागठबंधन केले.
Nitish Kumar Bihar CM
Nitish Kumar Bihar CMSaam TV

पटना : महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत (BJP) फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दलासह इतर मित्रपक्षांबरोबर युती करून पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडून महागठबंधन केले. (Nitish Kumar Latest News)

Nitish Kumar Bihar CM
मोठी बातमी : एकनाथ शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात? कारण...

राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या पाया पडून त्यांचे दर्शन घेतलं.

गेल्या 22 वर्षात नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. 2000 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते अवघे सात दिवसच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. (Bihar Politics News)

विशेष बाब म्हणजे अगदी दोन वर्षांपूर्वीच भाजपा आणि नितीश कुमार यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात वाद सुरू होता. हा वाद काही दिवसांपासून शिगेला पोहचला होता.

अखेर नितीश कुमारांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजद पक्षाला सोबत घेऊन महागठबंधन करण्याचा निर्णय घेतला. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार असून या आमदारांच्या पाठींब्याचे पत्र त्यांनी काल (९ ऑगस्ट) राज्यपालांकडे सोपवले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले होते.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com