Bilawal Bhutto Zardari - S Jaishankar : जयशंकर यांचा बिलावल भुट्टोंना लांबूनच नमस्कार; दहशतवादावरून फटकारले

SCO meet in Goa : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन न करता लांबूनच त्यांना नमस्कार केला.
SCO meet in Goa
SCO meet in Goa SAAM TV

SCO meet in Goa : शांघाय सहकार्य संघटनेच्या (Shanghai Cooperation Organisation) परराष्ट्र मंत्र्यांची आज, शुक्रवारी गोव्यात बैठक होत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सर्व सहयोगी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत केले. आजच्या या बैठकीत जुलैमध्ये होणाऱ्या बैठकीतील अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. याशिवाय १५ करारांनाही अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे. तसेच चार नवे भागीदारही यात सहभागी होणार आहेत.  (Latest Marathi News)

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन न करता लांबूनच त्यांना नमस्कार केला. यावेळी त्यांनी बैठकीला संबोधित करताना दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला. सीमेपलीकडील दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात आला पाहिजे. त्यांना होणारा निधी पुरवठा रोखला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला थेट नाव न घेता फटकारले.

संपूर्ण जग जेव्हा कोरोनाशी लढत होता. प्रत्येक देशात कोरोनानं मृत्यू होत होते. त्यावेळीही दहशतवादी कारवाया सुरूच होत्या, असेही ते म्हणाले.

SCO meet in Goa
Manipur Violence Update: मणिपूरमधील परिस्थिती चिघळली; हिंसाचारानंतर कर्फ्यू लागू, इंटरनेटपाठोपाठ आता रेल्वेसेवाही बंद

चीन-पाकिस्तानही बैठकीत सहभागी

तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. या दोन्ही देशांतील तणाव कायम आहे. दुसरीकडे बैठकीच्या आदल्या दिवशी चीनचे परराष्ट्र मंत्री छिन कांग यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी नवीन मार्ग शोधायला हवा, ज्याने दोन्ही देशांचा फायदा होईल, असे विधान केले होते.

यावेळी जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या समोरच दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाला होणारा निधीचा पुरवठा रोखायला हवा, असे त्यांनी सुनावले.

SCO meet in Goa
Pakistan Shooting : पाकिस्तानमध्ये शाळेवर हल्ला, स्टाफ रूममध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार; ७ शिक्षकांची निर्घृण हत्या

जयशंकर बोलत होते अन् पाकिस्तान फक्त ऐकत होता

या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो हे जयशंकर यांच्या समोरच बसले होते. जयशंकर यांनी सर्व परराष्ट्र मंत्र्यांना अभिवादन केले. त्यानंतर दहशतवादाच्या मुद्यावर खडे बोल सुनावले. दहशतवादाशी लढा देणे याला आपले प्राधान्य आहे. सीमेवर दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असे जयशंकर म्हणाले.

दहशतवादाशी एकत्रित लढा देऊ, असे सर्व देशांना आवाहन करतानाच टेरर फंडिंगसंदर्भात सर्व देशांना सावध राहण्याचा सल्लाही जयशंकर यांनी या बैठकीत दिला. दहशतवादांना जे फंडिंग केले जाते, ते तातडीने रोखायला हवे, असेही ते म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com