पाणी समजून बहिणीने चुकून पाजले डिझेल; आठ महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याचा मृत्‍यू

पाणी समजून बहिणीने चुकून पाजले डिझेल; आठ महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याचा मृत्‍यू
पाणी समजून बहिणीने चुकून पाजले डिझेल; आठ महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याचा मृत्‍यू
WaterSaam tv

मुंबई : लहान भाऊ रडतोय म्‍हणून त्‍याच्‍या चार वर्षांच्या बहिणीने भरलेली बाटली उचलून पाणी पाजले. परंतु, या बाटलीत असलेले डिझेल पाजले गेले. यात बाळाची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death) झाला. सदर हृदयद्रावक घटना नोएडामध्ये घडली आहे. (Noida Sister mistakenly spilled diesel understanding water Eight month old boy died)

Water
भीषण अपघात! प्रवाशांना घेऊन निघालेली जीप ५० फूट खोल दरीत कोसळली

नोएडातील सेक्टर 63 भागातील छिजारसी गावात झालेला हा प्रकार आहे. पीडितेचे कुटुंब मूळचे हरदोई येथील आहे. अनेक वर्षांपासून ते गावात वास्तव्यास आहेत. ही घटना सोमवारची आहे. घरातील सर्व सदस्य घरी उपस्थित होते. या दरम्‍यान आठ महिन्यांचे बाळ रडायला लागले. भावाला रडताना पाहून बहिणीने शेजारी पडलेली बाटली उचलली आणि पाणी म्‍हणून पाजू लागली. परंतु, त्‍यात पाणी नाही तर डिझेल (Diesel) आहे, हे त्या मुलीला माहीत नव्हते.

चिमुकला जोरात रडला अन्‌

डिझेल प्यायल्याबरोबर बाळ जोरजोरात रडू लागले. यानंतर घरातील सर्व सदस्य धावून आले. यावेळी मुलीने पाण्याऐवजी डिझेल दिल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी तात्काळ त्‍या बाळाला रुग्णालयात (Hospital) नेले. मात्र तीन दिवसांच्या उपचारानंतर मुलाचा अखेर मृत्यू झाला. यानंतर कुटूंबियांनी आक्रोश केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com