'सोने' पे सुहागा! कामाच्या ठिकाणी घेता येणार झोप! ही भारतीय कंपनी देत ​​आहे सुविधा

ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोप येणे सामान्य गोष्ट आहे. अनेकांच्या बाबतीत असे घडते की, कामाच्या दरम्यान त्यांना डुलकी येऊ लागते. विशेषत: दुपारी आणि तेही जेवण झाल्यावर झोप इतकी येते की असे वाटते थोडा वेळ झोप घेता आली असती तर किती बरं झालं असत...
'सोने' पे सुहागा! कामाच्या ठिकाणी घेता येणार झोप! ही भारतीय कंपनी देत ​​आहे सुविधा
SleepSaam Tv

ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोप येणे सामान्य गोष्ट आहे. अनेकांच्या बाबतीत असे घडते की, कामाच्या दरम्यान त्यांना डुलकी येऊ लागते. विशेषत: दुपारी आणि तेही जेवण झाल्यावर झोप इतकी येते की असे वाटते थोडा वेळ झोप घेता आली असती तर किती बरं झालं असत... ऑफिसमध्ये जर कधी डुलकी लागलीच आणि बॉसने बघितले तर किती मोठा प्रॉब्लेम होईल! पण कल्पना करा की जर तुम्हाला ऑफिसमध्ये थोडा वेळ झोप घ्यायला ऑफिसकडूनच परवानगी मिळाली तर... किती चांगले होईल. होय, बेंगळुरूमधील एक स्टार्टअप कंपनी (Startup Company) आपल्या कर्मचाऱ्यांना अशीच काही सुविधा देत आहे. तेथील कर्मचारी कामाच्या दरम्यान 30 मिनिटांची झोप घेऊ शकतात. काही लोकांसाठी ही सुविधा विचित्र वाटू शकते. परंतु बहुतेक कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा 'सोने पे सुहागा' आहे.

Sleep
Photos: नवरी होणार मी! सोनाक्षीनं मिस्ट्री बॉयसोबत दिली गुड न्यूज...

या स्टार्टअप कंपनीचे नाव वेकफिट सोल्यूशन (Wakefit Solution) आहे. कंपनीने स्वत: आपल्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म ट्विटरवर दोन फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये 'राईट टू नॅप' (Right To Nap) बद्दल सांगितले आहे. ऑफिसमध्ये काम करताना कर्मचारी कधी झोपू शकतात याची वेळही कंपनीकडून सांगण्यात आली आहे.

कंपनीने वेकफिटचे सह-संस्थापक चैतन्य रामलिंगगौडा (Chaitanya Ramalingegowda) यांच्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, कर्मचारी आता दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यान झोपू शकतात. सोबतच त्यांनी आपल्या ईमेलमध्ये, नासा आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासाचाही हवाला दिला आणि सांगितले की, फक्त 26 मिनिटांच्या झोपेमुळे कामाची कार्यक्षमता 33 टक्क्यांनी सुधारू शकते!

हे देखील पाहा-

कंपनीने असेही म्हटले आहे की ते कर्मचार्‍यांसाठी स्लिप पॉड्स आणि शांत जागा तयार करण्यावर काम करत आहेत, जेणेकरून कर्मचारी योग्य प्रकारे झोप घेऊ शकतील आणि उठल्यानंतर चांगले काम करू शकतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.