धक्कादायक! रुग्णालयात अशा अवस्थेतआढळला नर्सचा मृतदेह; पोलिसही हैराण

तरुणीच्या कुटुंबीयांनी, बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे.
धक्कादायक! रुग्णालयात अशा अवस्थेतआढळला नर्सचा मृतदेह; पोलिसही हैराण
Crime News Saam Tv

उन्नाव: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नाव येथील एका नर्सिंग होममध्ये एका तरुण नर्सचा मृतदेह भिंतीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. लटकलेला मृतदेह पाहून एकच खळबळ उडाली. मृत तरुणी शुक्रवारीच नर्सिंग होममध्ये रुजू झाली होती. तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. उन्नाव येथील बंगारामाऊ कोतवाली परिसरात ही घटना घडली आहे.

Crime News
पत्नीला नातेवाईकांच्या हवाली केलं, बलात्कार होत असताना नराधम पतीकडून घटनेचं चित्रण

उन्नावमध्ये शनिवारी सकाळी एका तरुणीचा मृतदेह एका नर्सिंह होमच्या भितींला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी बलात्कार करुन हत्या झाला असल्याचा आरोप केला आहे. या घटनेत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी (Police) पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, एका रुग्णालयात एका तरुणीचा मृतदेह लटकलेल्या असवस्थेत आढळला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तीन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं उन्नावचे अतिरिक्त एसपी शशिशेखर सिंह म्हणाले.

अहवालानुसार, मुलगी नर्स होती आणि शुक्रवारी तिचा कामाचा पहिला दिवस होता. रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती मृतावस्थेत आढळली. घटनास्थळी मुलीचा मृतदेह भिंतीला लटकलेला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.