ओडिशात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ३ जवान शहीद

रस्त्याचे काम सुरु असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.
Odisha News
Odisha NewsSaam Tv

नवी दिल्ली : ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा चौकीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) तीन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात दोन सहाय्यक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहे. एएसआय शिशुपाल सिंग, एएसआय शिवलाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.

हल्ला झाल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा हल्ला ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यात झाला आहे.

Odisha News
एकनाथ शिंदेंचे बंड पथ्यावर पडणार का? उपमुख्यमंत्री होण्याचा योग

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातील सहजप गावाजवळ दुपारी २.३० च्या सुमारास हा हल्ला झाला. रस्त्याचे काम सुरु असताना सीआरपीएफच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

Odisha News
Pankaja Munde यांना मुख्यमंत्री करा; भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी

एएसआय शिशुपाल सिंग, एएसआय शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले, त्यानंतर नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले आहेत.

सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. कारवाईसाठी एसओजी आणि सीआरपीएफच्या आणखी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com