PM Modi in Odisha: दोषींना सोडणार नाही! रेल्वे अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

Odisha Train Accident: दोषींना सोडणार नाही! रेल्वे अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य
PM Modi in Odisha
PM Modi in OdishaSaam Tv

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी पोहोचले आहेत.पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सकाळी अपघाताची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ओडिशात दाखल झाले आहेत. मोदींसोबत अनेक बडे नेते आणि अधिकारीही उपस्थित आहे.

पंतप्रधान माेदी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना रेल्वेमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांनी परिस्थितीची माहिती दिली. घटनास्थळी पंतप्रधान मोदींनी मदत आणि बचावकार्य करणाऱ्या जवानांशी संवाद साधला. रेल्वे अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दोषींवर कारवाई होणारच, त्यांना सोडलं जाणार नाही, असं म्हटलं आहे.

PM Modi in Odisha
Odisha Train Accident: 'देवाने आम्हाला दुसरं आयुष्य दिलं', अपघातातून अख्खं कुटुंब वाचलं, सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

घटनास्थळावरूनच पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांना केला फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावरूनच कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे. तसेच पीडित कुटुंबीयांची गैरसोय होणार नाही आणि जखमींना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी, असेही ते म्हणाले.  (Latest Marathi News)

PM Modi in Odisha
Raigad News : रेवदंडा पुलावरील वाहतूक 8 ते 10 जून राहणार बंद : जिल्हाधिकारी याेगेश म्हसे

जखमींशी साधला संवाद

अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी रुग्णालयात दाखल झाले. येथे त्यांनी अपघातात जखमी झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 261 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींना गोपालपूर, खंटापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com