Spacecraft: अमेरिका आणि रशियाची अंतराळ झेप; तीन अंतराळवीर स्पेस स्टेशन गाठणार

NASA News: अमेरिका आणि रशियाची अंतराळ झेप; तीन अंतराळवीर स्पेस स्टेशन गाठणार
Spacecraft
SpacecraftSaam Tv

International Space Station News:

कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून अंतराळवीरांची एक नवीन टीम शुक्रवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाली आहे. नासा अंतराळवीर लोरल ओ'हारा आणि रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को आणि निकोलाई चब यांचा यात समावेश आहे.

Spacecraft
Rahul Navin New ED Director: राहुल नवीन ED चे कार्यकारी संचालक, जाणून घ्या कशी आहे त्यांची कारकीर्द

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, नासाचे अंतराळवीर लोरल ओ'हारा आणि रोसकॉसमॉस कॉस्मोनॉट ओलेग कोनोनेन्को आणि निकोलाई चब यांनी स्थानिक वेळेनुसार रात्री 8.44 वाजता रॉसकॉसमॉस सोयुझ MS-24 अंतराळयानातून उड्डाण केले. अंतराळात ओ'हारा आयएसएसवर सहा महिने राहणार आहे, तर कोनोनेन्को आणि चुब तेथे एक वर्ष राहणार आहेत.  (Latest Marathi News)

ओ'हारा आणि चुब यांनी यापूर्वी कधीही अंतराळात उड्डाण केले नव्हते. हे दोघे अनुभवी अंतराळवीर आणि मिशन कमांडर कोनोनेन्को यांच्यासोबत अवकाशयानात आहेत. कोनोनेन्को याआधी चार वेळा अवकाशात गेले आहेत.

Spacecraft
Konkan News: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल दिलासा; पण ही सवलत कशी मिळवाल? जाणून घ्या प्रक्रिया

तीन तासांच्या उड्डाणानंतर तिघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचतील. जेव्हा ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचतील तेव्हा त्यांचे मॉड्यूल डॉक होईल आणि जेव्हा हॅच उघडतील तेव्हा ते युनायटेड स्टेट्स, रशिया, डेन्मार्क आणि जपानमधील सात अंतराळवीरांना भेटतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com