UK Survey: यूकेमध्ये ३ पैकी एका महिला सर्जनवर लैंगिक अत्याचार; सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड

Surgeons physical Assaulted: युनायटेड किंगडममधील आरोग्य विभागात करण्यात आलेल्या एका सर्व्हेत धक्कादायक बाब उघड झालीय.
UK Survey
UK SurveySaam Tv

UK Survey On Female Surgeons:

युनायटेड किंगडममधील आरोग्य विभागात करण्यात आलेल्या एका सर्व्हेत धक्कादायक बाब उघड झालीय. गेल्या पाच वर्षात येथे दर तीनपैकी एका महिला सर्जनवर त्यांच्याच सह-कर्मचाऱ्याकडून अत्याचार होत असल्याची बाब उघड झालीय.

याविषयीचा सर्व्हे ब्रिटिश जर्नल ऑफ सर्जरीकडून प्रकाशित करण्यात आलाय. गेल्या पाच वर्षांत यूके सर्जिकल वर्कफोर्समधील वर्तनाची तपासणी केली गेली. यात NHS(नॅशनल हेल्थ सर्व्हिस) मध्ये काम करणाऱ्या तीनपैकी एक महिला सर्जनवर सहकाऱ्यांकडूनच अत्याचार होत असल्याचं आढळून आले. आरोग्य विभागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १ हजार ४३४ जणांनी सहभाग घेतला. यात सहभाग घेणाऱ्या पुरुष आणि महिला सर्जनची ओळख लपवण्यात आलीय. (Latest News)

सर्व्हेक्षणातील ३० टक्के महिला सर्जनांनी सांगितले की, त्यांच्यावर अत्याचार झालेत. तर २९ टक्के महिलांना कामावर लैंगिक गैरवर्तन झाल्याचा अनुभव आला. सर्व्हेतील ४० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त महिलांनी सांगितलं की, त्यांना त्यांच्या शरीरावरून कमेंट ऐकाव्या लागल्या. तर ३८ टक्के महिलांना कामावर असताना फाजील बडबड ऐकावी लागते. बीबीसीने अहवालाचा हवाला देत सांगितलं की, ९० टक्के स्त्रिया आणि ८१ टक्के पुरुषांना गैरवर्तनाला सामोरे जावे लागलं.

दरम्यान अत्याचारावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असा निष्कर्ष निघाला की, पुरुष आणि महिला सर्जन हे "वेगवेगळ्या वास्तवात जीवन जगतात. वारंवार होणारे अत्याचार होण्यामागे तेथील वातावरण कारणीभूत असते. सत्ता आणि लिंगभेदामुळे सातत्याने अत्याचार , विनयभंग किंवा बलात्काराच्या घटना सातत्यानं घडतात. शिवाय या घटना घडल्यानंतर त्याचा तपासही योग्य प्रकारे होत नसल्याचं दिसून येतं. ज्याचा परिणाम म्हणून कामाच्या ठिकाणीही असुरक्षित वातावरण महिलांना जाणवत असल्याचं दिसून येतं, असं गार्डियनचा रिपोर्ट सांगतो.

सर्व्हेक्षणात एक अशी पण बाब समोर आलीय की, या समस्यांना लगाम घालण्यासाठी एचएस ट्रस्ट, जनरल मेडिकल कौन्सिल आणि रॉयल कॉलेजेस विश्वासार्ह नाहीत. गैरवर्तनच्या समस्या हाताळण्यासाठी जीएमसी योग्य कारवाई करतं असं फक्त केवळ १५.१ टक्के महिलांना वाटतं. यावर प्रतिक्रिया देताना सरे विद्यापीठाचे सल्लागार सर्जन प्रोफेसर कॅरी न्यूलँड्स म्हणाले, " आरोग्य सेवा काम करण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाण बनण्यासाठी आम्हाला तपास प्रक्रियेत मोठ्या बदलाची गरज आहे,जेणेकरून बाह्य आणि स्वतंत्र देतील."

पुढे अहवालात असे म्हटले आहे की, कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, अशा प्रकरणांमध्ये ते स्वतःला हानी पोहोचतात आणि पीडित व्यक्ती आत्महत्येचा विचार करतात.

UK Survey
G20 Summit: भारत-मध्य पूर्व -युरोप कॉरिडॉरचं काय आहे महत्व? काय होणार भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com