मंदिरातील पुजाऱ्यावर गोळीबार; स्थानिकांच्या मारहाणीत एक आरोपीचा मृत्यू

बिहारच्या दरभंगामध्ये मंदिरात एका पुजाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मंदिरातील पुजाऱ्यावर गोळीबार; स्थानिकांच्या मारहाणीत एक आरोपीचा मृत्यू
मंदिरातील पुजाऱ्यावर गोळीबार, स्थानिकांच्या मारहाणीत एक आरोपीचा मृत्यूSaam Tv

दरभंगा: बिहारच्या Bihar दरभंगामध्ये Darbhanga मंदिरात एका पुजाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरभंगातील राज संकुलातील कंकाली मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा Rajiv Kumar Zha यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. आज पहाटे 4.30 च्या सुमारास राजीव झा पूजा करत होते तेव्हा, हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

हे देखील पहा-

याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, ४ हल्लेखोर कारमधून By Car मंदिरात आले होते. मंदिरात Temple प्रवेश करुन त्यांनी राजीव झा यांच्यावर गोळ्या firing झाडल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. यादरम्यान दर्शन करण्यासाठी आलेल्या एका भक्तालाही गोळी लागली One devotee was also shot आहे.

मंदिरातील पुजाऱ्यावर गोळीबार, स्थानिकांच्या मारहाणीत एक आरोपीचा मृत्यू
Breaking: ईडीच्या कारवाईवरुन शिवसेना नेते आनंद अडसुळांना न्यायालयाचा दणका

या हल्ल्यानंतर पळून जात असताना स्थानिकांनी 3 हल्लेखोरांना पकडण्यात यश आलं आहे. तर एक हल्लेखोर पळून गेला आहे. यादरम्यान, स्थानिकांनी हल्लेखोरांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर सध्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भक्ताला रुग्णालयात तर दोन आरोपींना डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.