Online Fraud: HDFC खातेधारकांनो सावधान! एक SMS करेल तुमचं अकाऊंट रिकामं

एसएमएसद्वारे फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे
HDFC Bank
HDFC Bank Saam Tv

Online Fraud : डिजिटायजेशनमुळे आपली अनेक कामं सोपी झाली आहे. मोबाईलमध्ये एका क्लिकवर अनेक व्यवहार देखील होऊ लागले आहेत. मात्र एकीकडे कठीण कामं सोपी झाली असली तरी फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन आयडिया शोधून काढत असतात.

जर तुमचे खाते एचडीएफसी बँकेत असेल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण एसएमएसद्वारे फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे.

HDFC Bank
Video: होय मी सनी देओलच..शेतकरी अवाक; रस्‍त्‍याने बैलगाडीतून जाणाऱ्या शेतकऱ्याची अभिनेत्‍याकडून आस्‍थेने विचारपूस

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांना सध्या फिशिंग एसएमएस येत आहेत. ग्राहकांनी या मेसेजवर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून पैसे काढले जातात. दरम्यान एका युजरने ट्विटरवर पोस्ट केले की, त्याला मेसेजद्वारे केवायसी अपडेट करण्यास सांगितले. (Latest News)

या एसएमएसमध्ये लिहिले होते की, Dear customer your HDFC account will be hold today please update your KYC immediately click here.

HDFC Bank
Cricket News: मराठमोळ्या पोरीची WPLमध्ये धुवांधार खेळी! स्पॉन्सर नसल्याने बॅटवर लिहिलं धोनीचं नाव अन् कमालच केली

या ट्विटबाबत एचडीएफसी बँकेने सांगितले की, एचडीएफसीकडून असा कोणताही मेसेज पाठवला जात नाही. यूजर्सनी अशा मेसेजवर क्लिक करू नये किंवा अशा मेसेजना उत्तरही देऊ नये.

बँकेने कोणताही मेसेज पाठवल्यास, ती नेहमी त्यांच्या अधिकृत खात्यातून पाठवेल. बँक तुम्हाला कधीही मेसेजमध्ये OTP, UPI पिन, कस्टमर आयडी, बँकिंग डिटेल्स, एटीएम माहिती किंवा कोणत्याही प्रकारचा पासवर्ड विचारत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com