Parliament Building Inauguration: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार, 19 विरोधी पक्षांनी दर्शवला विरोध

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार, 19 विरोधी पक्षांनी दर्शवला विरोध
Parliament Building Inauguration
Parliament Building InaugurationSaam TV

Parliament Building Inauguration: देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र आता या इमारतीवरून देशभरात राजकारण सुरू झालं आहे.

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. तसेच या मोठ्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रित न करणे हा त्यांचा अपमान आहे, असं विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं आहे.

Parliament Building Inauguration
WHO Chief Warn For Next Pandemic: कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार! WHO प्रमुखांनी दिला इशारा, 2 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

या सोहळ्यावर 19 पक्षांनी बहिष्कारही घातला आहे. यात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचाही समावेश आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत यावर आपण बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं. (Latest Marathi News)

राऊत म्हणाले आहेत की, ''संसद भवनाचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हायला पाहिजे. पंतप्रधान नंतर येतात. लोकसभा अध्यक्ष नंतर येतात. प्रत्येक गोष्टीत निवडणूकसाठी राजकारण करायचं. फक्त मी आणि मीच या मी पणाचा हा कहर आहे.''

Parliament Building Inauguration
Mumbai AC Local Train: लोकलची एसी बंद, संतप्त प्रवाशांनी केलं रेल रोको

या राजकीय पक्षांनी टाकला बहिष्कार

  • आरजेडीने बुधवारी सकाळीच या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

  • संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार नाही.

  • डीएमके नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणार आहे.

  • तृणमूल काँग्रेसने या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला होता.

  • यानंतर आम आदमी पक्षानेही या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले.

  • भारतीय सीपीआयने मंगळवारी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकल्याची माहिती दिली होती. (Viral Video News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com