तालिबानला फ्रान्सनधून विरोध; आयफेल टॉवरवर झळकले नॉर्दन अलायन्सचे झेंडे

अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज आणि नॉर्दन अलायन्सचा झेंडा घेऊन अनेक लोकांनी आयफेल टॉवरजवळ गर्दी करत तालिबानला विरोध केला आहे.
तालिबानला फ्रान्सनधून विरोध; आयफेल टॉवरवर झळकले नॉर्दन अलायन्सचे झेंडे
तालिबानला फ्रान्सनधून विरोध; आयफेल टॉवरवर झळकले नॉर्दन अलायन्सचे झेंडेtwitter/@NA2NRF

पॅरिस: अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत वगळता तालिबानने अफगाणिस्तनता संपुर्ण ताबा घेतला आहे. ३० ऑगस्टला अमेरिकेचे शेवटचे विमानही काबुलहून आपल्या मायदेशी परतले. त्यानंतर काबुल एअरपोर्टता ताबाही अमेरिकेने घेतला. मात्र असं असलं तरी तालिबानचा प्रखर विरोध करणारे देशातून आणि देशाबाहेरुन तालिबान विरुद्ध आवाज उठवतायत. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील जगातील सर्वोच्च आयफेल टॉवरजवळ तालिबान विरोधकांनी नॉर्दन अलायन्सचे झेंडे दाखवत तालिबानला विरोध केला आहे. (Opposition to the Taliban in France; Flags of the Northern Alliance flashed on the Eiffel Tower)

हे देखील पहा -

एकीकडे अमेरिकेने आपलं सर्वच सैन्य माघारी घेतलं, तर दुसरीकडे तालिबानच्या खुरापती सुरु झाल्या आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी काबुल विमानतळ सोडल्यानंतर तालिबान्यांनी एअरपोर्टवर फटाके फोडत आणि हवेत गोळीबार करत आनंदोत्सव साजरा केला. आता काबुल आंतरराष्ट्रीय विमामतळही तालिबानच्या ताब्यात आहे. मात्र अफगाणिस्तानचा एकच असा प्रांत आहे जिथे तालिबानी अद्यापही कब्जा करु शकलेले नाहीत आणि येथून तालिबानला कडवा आणि सशस्त्र विरोध होतोय, तो प्रांत म्हणजे पंजशीर प्रांत. या प्रांताचे कमांडर अहमद मसूद आणि अफगाणिस्तानतचे स्वयंघोषित तथा काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह हे दोघे मिळून तालिबानशी पुर्ण ताकदीने लढतायत. सोबतच देशभरातू तालिबान विरोधकांना एकत्र करत त्यांच समर्थन प्राप्त करतायत.

अशातच नॉर्दन अलायन्सला हळूहळू जगभरातून पाठिंबा मिळतोय. पॅरिसमधील आयफेल टॉवरजवळ अफगाणिस्तानच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. हातात अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज आणि नॉर्दन अलायन्सचा झेंडा घेऊन अनेक लोकांनी आयफेल टॉवरजवळ गर्दी करत तालिबानला विरोध केला आहे.

तालिबानला फ्रान्सनधून विरोध; आयफेल टॉवरवर झळकले नॉर्दन अलायन्सचे झेंडे
दिवाळीनंतर राज्यात फटाके वाजवू, विखेंच्या विधानाने धमाका

१९९६ ते २००१ या कालावधीमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता होती. मात्र, या काळात देखील तालिबान्यांना अहमद शाह मसूद यांच्यामुळे पंजशीर खोऱ्यावर अंमल प्रस्थापित करता आला नव्हता. आताही पंजशीर पुर्ण ताकदीने लढा देत आहे. पण या लढ्यात त्यांना यश मिळतं का हे येणारा काळच सांगु शकेल.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com