शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी ही विरोधी पक्षांची इच्छा!

आज पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राष्ट्रपदीपदाची निवडणूक लढवावी. या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी ही विरोधी पक्षांची इच्छा!
Sharad Pawar's Name For President PostSaam TV

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राष्ट्रपदीपदाची निवडणूक लढवावी. या मुद्दयावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बैठकी दरम्यान माध्यमांशी बोलताना दिली. (Presidential Candidate)

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी आपण एका बैठकीचे आयोजन करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं होतं त्यानुसार आजची ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काही दिवसांवर येऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींमध्ये विरोधकांतर्फे एक उमेदवार देण्याच्या चर्चा देखील या बैठकीत होणार होती.

मात्र, या बैठकीआधीच आपण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे पवारांनी (Sharad Pawar) स्पष्ट केलं. तरीही आज झालेल्या विरोधकांच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या नावावरती सर्वांचे एकमत झालं असून पवारांनी स्वत:आपलं नाव या उमेदवारीसाठी दिलं तर चांगलंच आहे. अन्यथा आम्ही दुसऱ्या उमेदवाराबाबत विचार करु असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

हे देखील पाहा -

शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाबाबत उमेदवारी देण्यास नकार दिल्यानंतर फारुक अब्दुल्ला यांच्या नावाची देखील चर्चा झाली. मात्र, आपल्या नावाची चर्चा या पदासाठी करु नये असं त्यांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे. तसंच सुत्रांच्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी बैठकीत दोन नावे सुचवली होती. यामध्ये गोपाल कृष्ण गांधी आणि फारुख अब्दुला (Farooq Abdullah) यांच्याशिवाय एनके प्रेमचंद्रन यांचे देखील नावं होतं.

तसंच या बैठकीनंतर ममता यांनी सांगितलं की, महबुबू मुफ्ती आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे पहिल्यांच सर्व पक्षीय विरोधकांच्या बैठकीला हजर राहिले ही चांगली गोष्ट असून केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली आहेत त्यामुळे सर्व विरोधक एकत्र आले तर आपण मोदी सरकारच्या अत्याचाराला आळा घालू शकतो असंही ममता म्हणाल्या आहेत.

Sharad Pawar's Name For President Post
शरद पवारांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी; शिवसेनेचा आग्रह

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह असून पवार यांनी नकार दिल्यास राजकीय परिघाबाहेरील सर्वमान्य उमेदवार निवडावा, अशी भूमिका शिवसेनेच्यावतीने सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

आज भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षांना आमंत्रित केले होते. ममता बॅनर्जी यांच्या हाकेला प्रतिसाद देत १७ विरोधी पक्षांनी हजेरी लावली त्यामध्ये माजी पंतप्रधान देवगौडा, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांच्यासह अन्य पक्षातील महत्वाचे नेते उपस्थित होते. तर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची एकमताने शिफारस केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठकीस उपस्थित असणाऱ्या १७ विरोधी पक्षांचे आभार मानले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com