नॉर्वेच्या लष्कराचे सैनिकांना 'अंडरगार्मेंट्स' परत करण्याचे आदेश, कारण...

आर्मीने सैनिकांना आपली सेवा संपल्यानंतर मोजे, ब्रा आणि अंडरवेअर यांसारखे अंतर्वस्त्र परत करण्यास सांगितले आहे.
Norway Military
Norway MilitarySaam TV

नॉर्वेजियन आर्मीने (Norway Military) त्यांच्या सैन्याला विशेष ऑर्डर जारी केल्या आहेत, ज्यात सेवा संमाप्तीनंतर वापरलेल्या अंडरगारमेंट्स परत करणाचं सैनिकांना सांगण्यात आले आहे. लष्कराचा हा आदेश ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे की, लष्कराने असा आदेश का काढला असेल. असा तुम्ही विचार करत असाल पण नॉर्वेच्या सैनिकांनी (Norway Army Soldiers) वापरलेले हे अंडरगार्मेंट्स (Undergarments) आता दुसरे सैनिक वापरणार असल्याते नॉर्वेच्या आर्मीने सांगितले आहे. या आदेशाचा आणि कोरोनाचा काय संबंध आहे हे आपण जाणून घेवूयात.

काय आदेश दिले आहेत?

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार , नॉर्वेजियन सैन्याने आपली सेवा पूर्ण केलेल्या सैनिकांसाठी एक फरमान जारी केले आहे. ज्या सैनिकांनी आपली सेवा पूर्ण केली आहे, त्यांनी त्यांची अंतर्वस्त्रे परत करण्याचे लष्कराने सांगितले आहे. आर्मीने सैनिकांना आपली सेवा संपल्यानंतर मोजे, ब्रा आणि अंडरवेअर यांसारखे अंतर्वस्त्र परत करण्यास सांगितले आहे. यापूर्वी सैनिकांना ते स्वेच्छेने परत करण्यास सांगितले होते, परंतु आता अनिवार्य करण्यात आले असून सैनिकांना त्याचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Norway Military
IND vs SA: कोहली, रहाणे, पुजारा, आश्विन खास रेकॉर्डच्या उंबरठ्यावर

हा नियम का?

कोरोनामुळे पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. त्यामुळे विविध देशांमध्ये मास्क, लस आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही देशांमध्ये इंधन वितरणावरही परिणाम झाला असून लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महागाईही वाढली असून पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत, कोरोना व्हायरसमुळे पुरवठा साखळी प्रभावित झाल्यामुळे नॉर्वेजियन सैन्यातही हा आदेश घेण्यात आला आहे.

नॉर्वेमध्येही पुरवठा साखळी प्रभावित होत असल्याने मालाचा पुरवठा होत नाही. यामुळे, इतर सैनिकांसाठी अंडरगारमेंटची कमतरता आहे, त्यामुळे सैनिकांना असे करण्यास सांगितले आहे. यामुळे इतर सैनिकांना त्रास होत आहे आणि आर्मीने इतर सैनिकांना मदत करण्यास सांगितले आहे. दरवर्षी 8000 सैनिक सैन्यात भरती होत आहेत. याआधी सैनिकांना अंडरवेअर, लोकरीचे मोजे आणि टी-शर्ट यांसारखे अंतर्वस्त्र ठेवण्याची परवानगी होती. अहवालानुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आता या किटचा आम्ही पुन्हा वापर कऱण्याचा विचार केला आहे, त्यामुळे आम्हाला मदत झाली आहे. आमच्याकडे पुरेसा साठा नसल्याने आम्ही असे करत असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com