OYO Rooms: सलाम तुझ्या जिद्दीला! अवघ्या 19 व्या वर्षी सुरू केलेल्या कंपनीचं दिवाळं निघालं; न डगमगता पठ्ठ्यानं OYO उभारलं

OYO Rooms: त्याची नेटवर्थ सध्या 1 बिलियन डॉलर इतकी आहे.
OYO Rooms
OYO RoomsSaam TV

Ritesh Agarwal : OYO (Own Your Own) या कंपनीने आज जगभर आपलं जाळं पसरवलं आहे. आजवर तुम्हीही कधी ना कधी या रूमचा वापर केला असेल. एखाद्या वेगळ्या शहरात फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त गेल्यावर नेमकं कुठे रहायचं हा प्रश्न पडतो. त्यावेळी आधीच एखादी रूम बुक करून ठेवली तर त्याचा मोठा फायदा होतो. ऑनलाईन पद्धतीने आपण OYO रूम बुक करू शकतो. (Own Your Own)

राहण्याचा प्रश्न चुटकीसर्शी सोडवणाऱ्या या कंपनीच्या मालकाची कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आधीची कंपनी घाट्यात गेली तरी मनात जिद्द कायम होती. अन् वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हा अवलिया कोट्यधीश झाला. ही कहाणी आहे OYO कंपनीचा मालक असलेल्या रितेश अग्रवाल याची. खूप कमी वयातच त्याने व्यवसायात यशाचं शिखर गाठलं आहे.

OYO ची संकल्पना कशी सुचली.

साल 2012 त्यावेळी रितेश फक्त 19 वर्षांचा होता. एकदा तो त्याच्या कुटुंबीयांसोबत बाहेर फिरण्यासाठी गेला. देव दर्शनासाठी अग्रवाल कुटुंब गेलं होतं. यावेळी रात्री राहण्याची सोय तर हवी. त्यामुळे ते सर्व एका हॉटेलमध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांना एकही रूम मिळाली नाही. सर्व रूम या फुल झाल्या होत्या. यावेळी राहण्याची सोय न झाल्यानं रितेशला याचं वाईट वाटलं. आपल्याला सुद्धा आधीच रूम बुक करायला पाहिजे होती, असं त्याला वाटू लागलं. पण घरापासून एवढ्या लांब रूम बुक करण्यासाठी कसं येणार? हा प्रश्न त्याच्या मनात फिरत होता. त्यावेळी देव दर्शन करून घरी परतताना एक भन्नाट संकल्पना त्याच्या मनात आली.

OYO Rooms
Nagpur : OYO हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना! पोलिसांनी केली दोघींची सुटका

वयाच्या 25 व्या वर्षीच झाला कोट्यधीश

त्यानंतर त्याने आपल्या संकल्पनेला प्रत्यक्षात रेखाटण्याच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने Oravel Stays या कंपनीची स्थापना केली. त्याची ही अनोखी संकल्पना नागरिकांना खूप आवडली. अनेक जण अशा पद्धतीने आधीच हॉटेल बुक करून ठेवू लागले. ही कंपनी सुरू केल्यावर त्यांना 6 महिन्यांनी 30 लाखांचा फंड मिळाला. तसेच “थेल फाऊडेशन”च्या वतीने त्याला Theil Fellowship मिळाली.

OYO Rooms
MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या पत्नीची OYO हॉटेलमध्ये गळा आवळून हत्या !

या Fellowship ची किंमत 1 लाख डॉलर इतकी होती. यामुळे रीतेशच्या कंपनीने मोठं नाव आणि पैसा कमवला. या व्यवसायात आपण यशस्वी झालो आहोत असं वाटत असतानाच सर्व गोष्टी उलट होऊ लागल्या. हळूहळू रितेशच्या कंपनीचा तोटा होऊ लागला. एक वेळ अशी आली कर्मचाऱ्यांचा पगार कसा द्यावा असाही प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. अखेर कंपनीचा घाटा वाढत गेला आणि Oravel Stays ला टाळं लावण्याची वेळ आली.

एवढ्या जिद्दीने आणि मेहनतीने सुरू केलेली ही कंपनी बंद पडली मात्र रितेश अजिबात खचला नाही. त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. साल 2013 मध्ये त्याने OYO ( Own Your Own ) म्हणजेच तुमची स्वतःसाठीची खोली ही कंपनी सुरू केली. यावेळी रितेशने आपल्या आधीच्या काय चुका झाल्या ते शोधून काढलं. त्यावेळी त्याला समजलं की, प्रवासी बाहेर फिरण्यासाठी येत असतात. त्यावेळी त्यांना स्वस्त:त राहण्याची सोय हवी असते.

मात्र यावेळी खोली स्वस्त असली तरी ती अस्वच्छ नसावी असं प्रत्येकाला वाटतं. तसेच तेथील सुविधा देखील चांगल्या असणे गरजेचं आहे. त्यामुळे रितेशने OYO ची सुरुवात केल्यावर या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं. यात सुरुवातीला त्याने प्रत्येक ठिकाणी आपल्या कंपनीचे कर्मचारी पाठवून हॉटेलची पाहाणी केली. आपल्या गाईड लाईनमध्ये जे हॉटेल बसते तेच हॉटेल आपल्या साईटवर घेण्याचे त्याने ठवले.

पुढे Lightspeed Venture Partners (LSVP) आणि DSG Consumer Partners यांनी OYO कंपनीत 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तसेच जपानच्या Softbank या कंपनीने देखील अरबो रुपयांची गुंतवणूक केली. याचा रितेशला मोठा फायदा झाला. तेव्हापासून आतापर्यंत त्याची OYO कंपनी सगळ्यात पुढे धावत आहे. सध्या रितेश 30 वर्षांचा आहे आणि जगभरातील 80 देशांमध्ये त्याचा हा व्यवसाय पसरला आहे. त्याची नेटवर्थ सध्या 1 बिलियन डॉलर इतकी आहे. म्हणजेच 7 हजार 253 कोटी रुपये. खूप कमी वयात त्याने मिळवलं यश पाहून सगळेच अवाक झालेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com