Pakistan: माजी पीएम बेनजीर भुट्टो यांच्या मुलीच्या चेहऱ्याला धडकलं ड्रोन, अपघात की घातापात? (पहा Video)

Pakistan News: असिफा यांनी एका डोळ्याला बॅंडेज बांधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा बॅंडेज बांधलेला एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Pakistan Former PM Benazir Bhutto's daughter face hit by drone, accident or ambush? Watch the video
Pakistan Former PM Benazir Bhutto's daughter face hit by drone, accident or ambush? Watch the videoFacebook/@AseefaBZofficial

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या माजी दिवंगत पंतप्रधान बेनजीर भुट्टो (Aseefa Bhutto Zardari) यांच्या कन्या असिफा भुट्टो पाकिस्तानच्या राजकारणातील एक मोठं नावं आहे. काल (शुक्रवारी) त्यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडता-घडता वाचली आहे. त्याच्या राजकीय रॅलीदरम्यान एक ड्रोन (Drone) अचानक त्यांच्या चेहऱ्याला धडकले, ज्यामुळे त्यांच्या डोळ्याजवळ त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यात त्यांचा डोळा थोडक्यात बचावला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल (Viral Video) झाला आहे. (Pakistan Former PM Benazir Bhutto's daughter face hit by drone, accident or ambush? Watch the video)

हे देखील पहा -

पाकिस्तानाच्या (Pakistan) खानीवालमध्ये इम्रान सरकारविरोधात प्रचार करणाऱ्या पीपीपी (Pakistan Peoples Party) नेत्या असिफा भुट्टो या त्यांच्या राजकीय रॅलीला संबोधीत करत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या दरम्यान एक ड्रोन त्यांच्या खूपच जवळ आले आणि ड्रोनने त्यांच्या चेहऱ्यावर धडक दिली ज्यामुळे त्या जखमी झाल्या. या अपघातामुळे त्याच्या डोळ्यांजवळ अनेक टाके पडले असून त्यांचा डोळा थोडक्यात बचावला.

पीपीपी पक्षाचे कार्यकर्ते शुक्रवारी पाकिस्तानमधील खानवाल भागात निदर्शने करत होते, यात पीपीपीच्या बड्या नेत्यांसह असिफादेखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी प्रसारमाध्यमांचाही मोठा जमावडा होता. पण, एका मीडिया चॅनलचा ड्रोन अचानक पीपीपी नेत्या असिफा भुट्टो यांच्यावर धडकला आणि त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

या घटनेबाबत बिलावल भुट्टो म्हणाले की, हा फक्त अपघात आहे की कोणाचा तरी कट आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. तसे, बिलावलच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी ड्रोन ऑपरेटरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

Pakistan Former PM Benazir Bhutto's daughter face hit by drone, accident or ambush? Watch the video
Mumbai Crime: गुड मॉर्निंग करत हातात हात घेऊन अश्लील शेरेबाजी; उप-कुलसचिवांविरोधात गुन्हा दाखल...

सरकार काय म्हणाले?

पाकिस्तानच्या पंजाब सरकारचे प्रवक्ते हंसन खवर यांनी सांगितले की, घटनेनंतर डॉ. बाबर यांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांनी स्वतः जाऊन असिफा यांच्यावर प्रथमोपचार केले. सध्या, असिफा यांच्या डोळ्याजवळ एक लहान कट आहे आणि त्यांच्या हातावरही जखमा आहेत. याआधी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असं सांगण्यात आले होतं, मात्र असिफा यांनी एका डोळ्याला बॅंडेज बांधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा बॅंडेज बांधलेला एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com