Imran Khan News : पोलिसांना माझं अपहरण करून ठार मारायचंय; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

Imran Khan Arrest: पाकिस्तानमधील राष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Imran Khan
Imran KhanSaam Tv

Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेवरून लाहोरमध्ये गदारोळ झाला आहे. गेल्या 19 तासांपासून इम्रान खान यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्याच्या समर्थकांच्या प्रचंड विरोधामुळे पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत. दरम्यान, त्यानंतर आता इम्रान खान यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. पोलिसांना माझं अपहरण करून मला ठार मारायचं आहे असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Imran Khan
Political News : भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मंत्रिपद भूषवलेला नेता शिंदे गटात जाणार

या प्रकरणी इम्रान खान यांनी ट्विट केले आहे. त्यांनी व्हिडिओ क्लिप टाकली असून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. "माझ्या अटकेचा दावा केवळ एक नाटक आहे, त्यांचा खरा हेतू माझे अपहरण करून मला ठार मारण्याचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की इम्रान खान यांचे समर्थक काही वापरलेली काडतुसे दाखवत आहेत, ज्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला होता. इम्रान खान (Imran Khan) यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की पोलिसांनी (Police) त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. 

लाहोरमध्ये एवढा मोठा गदारोळ माजला होता 

मंगळवारी दुपारी इस्लामाबाद पोलीस कोर्टाकडून अटक वॉरंट घेऊन इम्रानला अटक करण्यासाठी लाहोरमध्ये पोहोचले. इम्रान लाहोरमधील जमान पार्क या निवासस्थानी राहतात. पोलीस आपल्यला अटक करण्यासाठी येणारआल्याची माहिती मिळताच त्यांनी सोशल मीडियावर आपल्या समर्थकांना तातडीने एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानंतर इम्रान खान यांचा पक्ष "पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ" चे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने त्यांच्या लाहोर येथील निवासस्थानी जमले. तेथे पोलिसांची त्यांच्याशी जोरदार झटापट झाली.

अनेकतास हा संघर्ष चालला. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याचा मारा आणि गोळीबार केला. या गोळीबारात इम्रान खान यांचे अनेक समर्थक जखमी झाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com