पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ मागील तीन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक
Pakistan Former President Pervez Musharrafsaam tv

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मुशर्रफ हे एमायलॉयडोसिसमुळं आजारी झाल्याने तीन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवरुन बाहेर काढण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक असून नागरिकांनी त्यांच्या उत्तम आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहनही मुशर्रफ यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे.

Pakistan Former President Pervez Musharraf
नागरिकांनी शांतता राखावी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०१६ मध्ये मुशर्रफ उपचारासाठी दुबईला (Dubai) गेले होते. तेव्हापासून ते दुबईलाच असल्याचं समजते. मुशर्रफ हे एमायलॉयडोसिसमुळं गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, मुशर्रफ यांना उपचारांची साथ मिळत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरुन बाहेर काढलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com