Imran Khan Viral Audio Clip: महिलेसोबचे अश्लिल संभाषण थेट युट्यूबवर! व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे इम्रान खान पुन्हा अडचणीत

इम्रान खान यांची एक ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होत असून ज्यामध्ये ते महिलेसोबत अश्लिल संभाषण करत असल्याचे दिसत आहे.
 Imran Khan News
Imran Khan NewsSAAM TV

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत येत असतात. आता त्यांच्या एका व्हायरल क्लिपमुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. इम्रान खान यांची एक ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होत असून ज्यामध्ये ते महिलेसोबत अश्लिल संभाषण करत असल्याचे दिसत आहे.

 Imran Khan News
Beed : दुर्दैवी! कर्जबाजारीपणाला कंटाळून 55 वर्षीय शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेसोबत अश्लिल संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्याने इम्रान खान चांगलेच वादात सापडले आहेत. पाकिस्तानधील सय्यद अली हैदर या पत्रकाराने त्यांची ही अश्लिल ऑडिओ क्लिप थेट युट्यूबवर अपवलोड केली आहे. हा रेकॉर्डिंग केलेला कॉल पंतप्रधान कार्यालयातून केला असून त्यामधील महिला त्यांच्याच पक्षाची मंत्री असल्याचाही दावा केला गेला आहे.

या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये इम्रान खान अत्यंत अश्लिल भाषेत महिलेशी संभाषण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरल क्लिपनंतर इम्रान खान यांच्यावर चौफेर टिका होत असून ही क्लिप बनावट असल्याचे इम्रान खान यांनी म्हणले आहे. याबद्दल इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने खुलासा करताना या क्लिपच्या माध्यमातून विरोधक प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणले आहे.

 Imran Khan News
Hyundai Electric Car : 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार Hyundai ची इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या, स्पेसिफिकेशन्स

या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर इम्रान खान यांना जोरदार ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानी (Pakistan) महिला पत्रकार नाइला इनायत यांनी ट्विट करत "इम्रान खान आता इम्रान हाश्मी झाले आहेत," अशी टिका केली आहे. दरम्यान ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वादात सापडण्याची इम्रान खान यांची पहिली वेळ नाही. याआधीही त्यांची संसदेतील खासदारांना विकत घेण्याची चर्चा करतानाची क्लिप व्हायरल झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com