पाकिस्तानचे मंत्री म्हणाले- 'Garlic मतलब आदरक', खूप झाले ट्रोल; पाहा Video

खरे तर पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी लसणाचे अदरक असे वर्णन करून चौफेर कोंडी करुन घेतली आहे.
पाकिस्तानचे मंत्री म्हणाले- 'Garlic मतलब आदरक', खूप झाले ट्रोल; पाहा Video
पाकिस्तानचे मंत्री म्हणाले- 'Garlic मतलब आदरक', खूप झाले ट्रोल; पाहा VideoSaam TV

सोशल मीडिया आणि पाकिस्तान...यांचं नातं खरच खूप आगळं वेगळं आहे. कारण रोज नवीन नवीन गोष्टी पाकिस्तानमधून व्हायरल होत असतात. कधी देशाचे खेळाडू असे काही करतात ज्यामुळे संपूर्ण देशाची बदनामी होते, तर कधी येथील नेते असे काही बोलतात ज्यामुळे त्यांना ट्रोल केले जाते. आता या एपिसोडमध्ये पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांचे नाव जोडले गेले आहे. त्याने असे काही बोलले आहे, ज्यामुळे सोशल मीडिया यूजर्स त्यांची खिल्ली उडवत आहेत. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

खरे तर पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी लसणाचे अदरक असे वर्णन करून चौफेर कोंडी करुन घेतली आहे. आता लोक त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहेत. पाकिस्तानच्या या मंत्र्याच्या ज्ञानावरही यूजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हा व्हिडिओ पत्रकार नायला इनायतने शेअर केला आहे. जो आतापर्यंत 1 लाख 64 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 5 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. चला तर मग हा व्हिडिओ पाहूया. (Pakistan Minister Viral Video)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फवाद चौधरी महागाईच्या मुद्द्यावर प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत. दरम्यान, फवाद म्हणाले, 'गार्लीक' म्हणजे आले. आल्याचे दरही खाली आले आहेत. जसे आपण सर्व जाणतो की आले आणि लसूण या दोन भिन्न गोष्टी आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर फवाद चौधरी ट्रोल होत आहे.

फवाद चौधरी अनेकदा भारताविरुद्ध बोलताना दिसत असतात. भारताकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा दावा त्यांनी नुकताच केला होता. आणि भारत पाकिस्तानशी स्पर्धा करू शकत नाही. त्यानंतर फवाद चौधरी यांनी असेही म्हटले होते की, देशाला जर कोणाकडून धोका असेल तर तो आपल्या आत म्हणजेच पाकिस्तानकडून आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com