Imran Khan News : पाकिस्तानात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा, इम्रान खान यांच्या घरावर चालवले बुलडोजर

Pakistan News : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे.
Imran Khan News
Imran Khan NewsSaam Tv

Imran Khan News : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेवरून लाहोरमध्ये गदारोळ झाला आहे.

तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आज इस्लामाबाद न्यायालयात हजर होणार होते, मात्र न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांच्या ताफ्याला इस्लामाबाद टोल प्लाझा येथे थांबवण्यात आले आहे. दुसरीकडे, इम्रान खान इस्लामाबादला रवाना झाले तेव्हा पोलीस त्यांच्या लाहोरमधील घरी पोहोचले. यावेळी पोलीस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. (Latest Marathi News)

Imran Khan News
Khed Sabha : घरी बसून... खेडच्या सभेपुर्वीच उदय सामंतांनी घेतला उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांचा समाचार

त्याचवेळी पंजाब पोलिसांनी (Police) इम्रानच्या घराबर बुलडोझर चालवल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. यावेळी समर्थकांनी विरोध केला असता २० जणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईवर इम्रान खान (Imran Khan) संतापले असून त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

या ट्विटमध्ये इम्रान खान म्हणाले की, माझ्यापत्नी घरी एकटीच आहे. मी घरात नसताना पोलीस कोणत्या कायद्याखाली ही मोहीम राबवत आहेत? माझी अटक ही 'लंडन प्लॅन'चा एक भाग असल्याचे इम्रान खान यांनी म्हटलं आहे. माझी अटक नवाझ शरीफ यांच्या सांगण्यावरून होत आहे. मला निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे असा खळबळजनक दावा इम्रान खान यांनी केला आहे.

इमरान खान यांच्या लाहोरमधील घराबाहेरील वातावरण खूपच बिघडले आहे. इम्रानच्या जमान पार्क येथील घराच्या टेरेसवरून पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी तेथे उपस्थित असलेल्या पीटीआय कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. पीटीआय कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचाही वापर केला. पोलिसांच्या या कारवाईत इम्रानच्या घराचा दरवाजा तोडण्यासाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

तोशाखाना प्रकरणामुळे इम्रान खान सध्या अडचणीत सापडले आहेत. इम्रान खान यांच्यावर भेटवस्तूंमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून, त्यांना त्यांच्या युरोप आणि विशेषतः अरब देशांच्या दौऱ्यात अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या होत्या. इम्रान खान यांनी अनेक भेटवस्तू घोषित केल्या नाहीत, तर अनेक भेटवस्तू मूळपेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी केल्या गेल्या आणि जादा दराने विकल्या गेल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com