
गेल्या काही दिवासांपासून पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. गिलगीट आणि बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात मोठा जन-आक्रोश निर्माण झालाय. पाकिस्तान सरकारच्या भेदभावपूर्ण आणि जाचक धोरणांवर येथील जनता प्रचंड संतापलीय. शोषणाला कंटाळलेल्या स्थानिक लोकांनी भारतातील लडाखमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी केलीय. (Latest News on Politics)
त्यात केंद्रीय मंत्री आणि निवृत्त माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरवर मोठं विधान केलंय. पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल. यासाठी थोडी प्रतीक्षा करा, असं विधान निवृत्त माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी केलंय. राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. जनरल व्ही.के.सिंह हे भाजपच्या परिवर्तन संकप्ल यात्रेनिमित्त राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत.
राजस्थानच्या दौसा येथील एका पत्रकार परिषदेत त्यांना पाकव्याप्त काश्मीरविषयी प्रश्न केला गेला. पीओकेमध्ये सिया मुस्लीम भारताची सीमा उघडण्याचं सांगत आहेत. यावर तुमचं काय मत? असा प्रश्न केंद्रीय मंत्री आणि निवृत्त माजी सेना प्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरचं आपोआप भारतात येईल. तुम्ही फक्त काही वेळ प्रतीक्षा करा.
दरम्यान, काश्मीरी कार्यकर्ता शब्बीर चौधरी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या पाकिस्तान विरोधात जोरदार प्रदर्शन चालू आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या शहारांमध्ये, गावांमध्ये महागाई वाढलीय. तसेच सरकारकडून लावण्यात आलेल्या जास्त करामुळे तेथील जनता रस्त्यावर उतरलीय. जम्मू-काश्मीरचे कार्यकर्ते शब्बीर चौधरी यांनी तेथील सामान्य जनतेच्या चिंतेचा प्रश्न उपस्थित केलाय. तेथे होणाऱ्या जन-आक्रोशासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
गिलगीट बाल्टिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानमधील गहूसह इतर खाद्य सामुग्रीवर अुनदान, भार नियमन, अवैध जमिनीवर कब्जा आणि नैसर्गिक संसाधनांवर शोषण करण्यात येत असल्याचे प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान तेथील वृत्तपत्रांमध्ये पाकिस्तानचं सैन्य बाल्टिस्तानच्या जमिनीवर संसाधनांवर जबरदस्त कब्जा करत आहे. यामुळे तेथे पाक लष्कर आणि सरकारविरोधात आंदोलन केलं जातं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.