Imran Khan Claim : माझी हत्या होऊ शकते; इम्रान खान यांचा कोर्टात खळबळजनक दावा, पाकिस्तान धुमसतंय

Imran Khan Arrest : मला गेल्या २४ तासांत बाथरूममध्येही जाऊ दिले नाही. माझी हत्या होऊ शकते अशी मला भीती वाटते, असा खळबळजनक दावा इम्रान खान यांनी केला.
Imran Khan Arrest
Imran Khan ArrestSAAM TV

Imran Khan Life Threats Claims : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पार्टीचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्सने काल अटक केल्यानंतर त्यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मला गेल्या २४ तासांत बाथरूममध्येही जाऊ दिले नाही. माझी हत्या होऊ शकते अशी मला भीती वाटते, असा खळबळजनक दावा इम्रान खान यांनी केला.

इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, माझ्या डॉक्टरला बोलवावे. मला दुसऱ्या संस्थेच्या माध्यमातून वॉरंट बजावण्यात आले आहे. दरम्यान, इम्रान यांना मंगळवारी निमलष्करी दलाच्या जवानांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या (Islamabad High Court) परिसरातून अटक केली. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात ते सुनावणीसाठी न्यायालयात गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली. (Latest Marathi News)

Imran Khan Arrest
Imran Khan Arrested: पाकिस्तानात गृहयुद्ध, इम्रान खान यांच्या अटकेनंतर भडकली हिंसा

इम्रान खान यांच्या अटकेनंतर लाहोर-इस्लामाबाद, पेशावरसह संपूर्ण देशात त्यांच्या समर्थकांकडून विरोध दर्शवण्यात आला. ठिकठिकाणी निदर्शने झाली. काही शहरांमध्ये हिंसाचाराच्याही घटना घडल्या. पेशावरमध्ये एके-४७ रायफलमधून गोळीबार करण्यात आला असून, त्यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजते.

Imran Khan Arrest
Imran Khan Net Worth : 600 एकर जमीन, हेलिकॉप्टर; अमाप संपत्तीचे मालक आहेत इम्रान खान

इम्रान खान यांच्या अटकेनंतर काय-काय घडलं?

इम्रान खान यांना अटक केल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली. खान यांच्या अटकेनंतर त्यांना सर्वात आधी एनएबीच्या कार्यालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना एका अज्ञात स्थळी नेलं. बुधवारी त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. माझ्या जीवाला धोका आहे, असा दावा खान यांनी केला आहे.

मला एका अन्य संस्थेच्या माध्यमातून वॉरंट बजावण्यात आले. तसेच माझी अटक ही चुकीच्या पद्धतीने झाली आहे, असा आरोप इम्रान खान यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com