Baba Ramdev : लवकरच पाकिस्तानचे ४ तुकडे होतील, त्यातील तीन.., बाबा रामदेव यांचा मोठा दावा

लवकर पाकिस्तानचे चार तुकडे होतील आणि त्यातील तीन तुकडे हे भारतात विलीन होतील, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
Baba Ramdev
Baba RamdevSaam Tv

Baba Ramdev News : योगगुरू बाबा रामदेव यांनी एक मोठा दावा केला आहे. लवकर पाकिस्तानचे चार तुकडे होतील आणि त्यातील तीन तुकडे हे भारतात विलीन होतील, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हरिद्वारमधील पतंजली योगपीठात योग साधनेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. (Latest Marathi News)

Baba Ramdev
VIDEO : क्रिकेटच्या मैदानावर CM शिंदेंची फटकेबाजी; पुल शॉट असा खेळला की कार्यकर्ते पाहातच राहिले!

काय म्हणाले बाबा रामदेव?

योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी पाकिस्तानचे लवकरच चार तुकडे होतील असा दावा केला आहे. ते म्हणाले, लवकरच पाकिस्तानचे चार तुकडे होतील, बलूचिस्तान स्वतंत्र देश होईल. तर पाकव्याप्त काश्मीर व पंजाब भारतात विलीन होतील. येणाऱ्या काळात भारत एक महाशक्ती म्हणून नावारूपास येईल.

'पाकिस्तान एक छोटा देश होईल'

पुढे बोलताना बाबा रामदेव म्हणाले, जागतिक राजकारणात खूप काही सुरू आहे. युक्रेन व रशियात युद्ध सुरू आहे. चीन व पाककडून भारतविरोधी कुरापती सुरू आहेत. तालिबान्यांनाही आता अफगाणिस्तान सांभाळता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे (Pakistan) तीन भाग भारतात विलीन होताच अखंड भारताचे स्वप्न साकार होईल.

Baba Ramdev
Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार?, ताब्यात असलेल्या वैद्यनाथ बँकेला आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस

दरम्यान, बाबा रामदेव यांनी धर्मवादावर देखील भाष्य केलं. सद्यस्थितीत सनातन धर्मावरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. रामायण, भगतद् गीता, वेद व उपनिषदांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय कट कारस्थानांतर्गत केले जात आहे. आम्ही प्रोपगेंडा कदापी सहन करणार नाही, असे रामदेव बाबा म्हणाले.

सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी देशात धार्मिक दहशतवाद सुरू आहे. त्यात कधी सनातन धर्म, तर कधी आपल्या महापुरुषांचे चारित्र्य हनन केले जात आहे. असे करणारे देशविरोधी आहेत. हे सर्वकाही परकीय शक्तींच्या इशाऱ्यानुसार होत आहे, असे रामदेव म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com