'बीएसएफ'ने पाडले पाकिस्तानचे ड्रोन; ड्रोनमधून सुरु होती हेरॉईनची तस्करी

ड्रोनमधून हेरॉईनची नऊ पॅकेट जप्त केली आहेत आणि सीमापार तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
'बीएसएफ'ने पाडले पाकिस्तानचे ड्रोन; ड्रोनमधून सुरु होती हेरॉईनची तस्करी
BSFSaam Tv

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तानकडून येणारे ड्रोन पाडले. या ड्रोनमध्ये एक बॅग होती. या बॅगमध्ये हेरॉईन ठेवण्यात आले होते. हा ड्रोन पंजाबमधील अमृतसरमध्ये हेरॉईन घेऊन जात होते अस सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी ड्रोन पाहून ते बीएसएफच्या जवानांनी गोळ्यांनी पाडले. त्यांनी ड्रोनमधून हेरॉईनची (Drugs) नऊ पॅकेट जप्त केली आहेत आणि सीमापार तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

ही माहिती बीएसएफने ट्विट करुन दिली आहे. “फ्रंटियर बीएसएफ जवानांनी पाकिस्तानी ड्रोनद्वारे तस्करीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानकडून येणारे हे ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले. ड्रोनमधून एका पिशवीतील नऊ पाकिटे जप्त करण्यात आली असून त्यात हेरॉईन (१०.६७० किलो) असल्याचा संशय आहे., अस ट्विट बीएसफने केले आहे.

BSF
ड्युटीमुळे त्रस्त बीएसएफ जवानाने आपल्या साथीदारांवर केला गोळीबार; 5 जणांचा मृत्यू

काही दिवसापूर्वी जम्मू-काश्मीर सीमेवरील सांबा सीमेवर बीएसएफला एक संशयास्पद बोगदा सापडला होता. चक फकिरा येथील सीमा चौकी परिसरात सायंकाळी ५.३० च्या सुमारास सुरुंगविरोधी कारवाईदरम्यान जवानांना संशयास्पद बोगदा आढळून आला. सांबा येथील कुंपणाजवळील एका सामान्य भागात हा बोगदा सापडला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com