पाकिस्तानी पोलीस मुलावर लावतोय 50 हजारांची बोली, कारण...!; पाहा Video

हा धक्कादायक व्हिडिओ पाकिस्तानातील सिंध भागातील असून, हा पोलीस घोटकी जिल्ह्यात राहतो. तो तुरुंग विभागात काम करतो.
पाकिस्तानी पोलीस मुलावर लावतोय 50 हजारांची बोली, कारण...!; पाहा Video
पाकिस्तानी पोलीस मुलावर लावतोय 50 हजारांची बोली, कारण...!; पाहा VideoSaam TV

पाकिस्तान : एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गणवेशात उभा असलेला एक माणूस आपल्या दोन मुलांसह रस्त्यावर काही आवाहन करत आहे. हा व्हिडिओ वेगाने रिट्विट केला जात आहे (Pakistan Police Viral Video). त्याची भाषा वेगळी आहे, मात्र तो ५० हजार रुपयांना आपल्या मुलांना विकण्याची बोली लावत असल्याचे कळते आहे.

माध्यमांच्या मते, हे प्रकरण पाकिस्तानमधील आहे (Pakistan Viral Video). हा धक्कादायक व्हिडिओ पाकिस्तानातील सिंध भागातील असून, हा पोलीस घोटकी जिल्ह्यात राहतो. तो तुरुंग विभागात काम करतो आणि झालं असं की तो रस्त्यावर उभा राहून आपल्या दोन लहान मुलांचा लिलाव करत आहे. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे.

पोलीस कर्मचारी भ्रष्टाचाराने हैराण झाले आहेत.

शेख सरमद नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या पोलिसाचे नाव निसार लाशारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो तुरुंग विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगतो. येथे त्याचे वरिष्ठ त्याला मुलाच्या उपचारासाठी सुटी देण्याच्या बदल्यात लाच मागत आहेत. लाच देऊ न शकल्याने त्याची रजा रद्द करण्यात आली. एवढेच नाही तर शहरापासून 120 किमी दूर असलेल्या लारकाना येथे लाशारी इथे बदली करण्यात आली. तो त्याच्या बॉस विरुद्ध तक्रार देखील करू शकत नाही, कारण त्याची वरपर्यंत पोहोच आहे.

पाकिस्तानी पोलीस मुलावर लावतोय 50 हजारांची बोली, कारण...!; पाहा Video
IND vs NZ: दुसऱ्या सामन्यात राहूलला विश्रांती तर सिराज जखमी? ; असा असेल संघ

व्हिडिओने समस्या सोडवली

भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या निसार यांनी घोटकीच्या रस्त्यावर उभे राहून आपल्या आजारी मुलासाठी ५० हजारांची बोली लावली. वेबसाइटनुसार, निसार लाशारीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांची याचिका सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्यापर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करत त्यांनी निसार यांची नोकरी घोटकी येथेच राहण्याचे आदेश दिले असून, मुलाच्या उपचारासाठी त्यांना १४ दिवसांची रजा देण्याचेही सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com