Sania Ashiq: पाकिस्तानच्या महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल!

हा व्हिडिओ माझी बदनामी करण्यासाठी व्हायरल केला गेला असून या व्हिडिओत माझ्यासारखी महिला आहे असं स्पष्टीकरण सानिया आशिक यांनी दिलंय.
Sania Ashiq: पाकिस्तानच्या महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल!
Sania Ashiq: पाकिस्तानच्या महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल!Facebook.com/ Sania Ashiq Official

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये एका महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. सानिया आशिक या पाकिस्तानच्या मुस्लीम लीग नवाज पक्षाच्या सदस्य असून त्या पंजाब प्रांतातील तक्षशिला मतदार संघाच्या आमदार आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून सध्या एका संशयिताला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. (pakistan's mla sania ashiq offensive video gona viral)

हे देखील पहा -

हा व्हायरल व्हिडीओ एका रुममध्ये शूट करण्यात आल्याचं दिसतंय. यामध्ये एक महिला नग्नावस्थेत दिसत असून व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला आमदारच असल्याचा दावा केला जातोय. मात्र हा व्हिडिओ माझी बदनामी करण्यासाठी व्हायरल केला गेला असून या व्हिडिओत माझ्यासारखी महिला आहे असं सानिया आशिक म्हणाल्या.

या प्रकरणाबाबत पाकिस्तानच्या आमदार सानिया आशिक यांनी ट्विट केलं की, “त्यांनी माझे व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल करण्याबरोबरच सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. व्हिडीओत दिसणारी महिला माझ्यासारखी दिसते. मला धमकावणारे शेकडो कॉल्स, टिकटॉकवरील अश्लील गाणी, फेसबुकवरच्या आक्षेपार्ह पोस्ट आणि माझ्याशी संबंधित कोणतेही व्हिडीओ व्हायरल करुन माझी प्रतिमा खराब करण्याचं काम केलं जात आहे,” असा आरोप सानिया यांनी आपल्या ट्विटमधून केलाय आहे. या प्रकारामुळे त्या तणावात आहेत.

Sania Ashiq: पाकिस्तानच्या महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल!
कमला हॅरिस बनल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा!

सानिया आशिक या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आणि पीएमएल-एनच्या प्रमुख नेत्या मरियम नवाज यांच्या निकटवर्तीय आहेत. सानिया या पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन टीका करत असतात. मात्र या त्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओमुळे त्या तणावत असून आरोपींचा लवकरात-लवकर शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com