Union Budget Session 2022: संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २ टप्प्यात; तारखा जाहीर

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Union Budget Session 2022: संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २ टप्प्यात; तारखा जाहीर
ParliamentSaam Tv

नवी दिल्ली - संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Parliament's Budget Session) कधी होणार यांची नुकतीच घोषणा काण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ८ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. दोन टप्प्यात हे अधिवेशन असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीला पार पडणार असून दुसरा टप्पा १२ मार्चला सुरु होणार आहे. तर, ८ एप्रिला अधिवेशनाची समाप्ती होणार आहे. या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) या १ फेब्रुवारीला बजेट सादर करणार अशी माहिती देण्यात आली आहे. (Parliament Budget Session Date Announced)

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही दिवसांपूर्वी संसद भवनाची पाहणी केली. देशात सध्या 2 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, अशा स्थितीत संसदेचं बजेट अधिवेशन जाहीर करण्यात आलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com