PM Modi Speech: 'हा देशासाठी ऐतिहासिक क्षण; या पवित्र भूमीला माझा प्रणाम...' जुन्या संसदेत PM मोदींचं शेवटचं भाषण

Parliament Special Session Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या जुन्या इमारतीत सर्व खासदारांसह खास फोटोसेशन केले. तसेच पंतप्रधान मोदींचे शेवटचे भाषणही झाले.
Parliament Special Session Update:
Parliament Special Session Update:Saamtv

Parliament Special Session:

सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच याच शुभमुहूर्तावर आजपासून नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार आहे. नव्या संसदेत आज दुपारी १ वाजल्यापासून कामकाजाला सुरूवात होईल. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या जुन्या इमारतीत सर्व खासदारांसह खास फोटोसेशन केले. तसेच पंतप्रधान मोदींचे शेवटचे भाषणही झाले.

Parliament Special Session Update:
Mumbai Police Homes : मुंबई पोलीस परिवाराला 'बाप्पा' पावला, घरांच्या लॉटरीची तारीख ठरली, करारही लगेच होणार

काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

जुन्या संसदेला अखेरचा निरोप देताना पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) हा देशासाठी भावूक क्षण असल्याचे सांगितले. या वास्तूमधून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, असे सांगत अनेक महत्वाचे निर्णय याच संसदेतून घेतल्याचे ते म्हणाले. याच सभागृहात मुस्लिम समजातील महिलांना न्याय मिळाला. तीन तलाक विरोधी कायदा इथेच तयार झाला. कलम 370 पासूनही याच सभागृहातून मुक्तता मिळाली.. असे सांगत मोदींनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या पुढील वाटचालीवरही भाष्य केले. हे भवन भावनांनी भरलेले आहे, असे म्हणत नवीन संसद भवनात नवीन भविष्याचा शुभारंभ करत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत आज नवीन चेतना घेवून जागृत झाला आहे. नव्या संसदेत नवीन प्रेरणेसह प्रवेश करणार आहोत असे म्हणत आपल्यातील काही लोक निराश होऊ शकतात, मात्र आज भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

Parliament Special Session Update:
Mumbai Police Homes : मुंबई पोलीस परिवाराला 'बाप्पा' पावला, घरांच्या लॉटरीची तारीख ठरली, करारही लगेच होणार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com