
संसदेचं विशेष अधिवेशनाला उद्यापासून (सोमवार 18 सप्टेंबर ) सुरुवात होणार आहे. हे विशेष अधिवेशन येत्या 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या अधिवेशनाची घोषणा केल्यापासून हे अधिवेशन या ना त्या कारणाने चर्चेत आहे. हे अधिवेशन कशासाठी बोलावलं गेलं आहे ही चर्चा सुरु असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप जारी करत विशेष अधिवेशनाला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं अधिवेशनात काही तरी विशेष घडेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अधिवेशन बोलावण्याचं कारण काय असा सवाल करत पत्र लिहिल्यानंतर आणि विरोधकांच्या टिकेनंतर केंद्र सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा अजेंडा जाहीर केलाय.
19 सप्टेंबर 2023 म्हणजे पहिल्या दिवसाचा अजेंडा:
- संविधान सभेपासून संसदेच्या 75 वर्षात काय अनुभव आले, काय मिळवलं, गेल्या 75 वर्षात आलेले अनुभव, गेल्या 75 वर्षातील आठवणी आणि काय शिकलो यावर चर्चा होईल. (Latest Marathi News)
चार महत्त्वाचे विधेयक या विषेश अधिवेशनात येणार आहेत... ती खालील प्रमाणे -
- अधिवक्ता दुरुस्ती विधेयक
- प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियडिकल बिल
- पोस्ट ऑफिस बिल
- मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती विधेयक
19 सप्टेंबर 2023:
- गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नवीन संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार
- नवीन संसद भवनात कर्मचारी नवीन गणवेशात दिसणार... मार्शल, सुरक्षा रक्षक, अधिकारी, चेंबर अटेंडेंट यांना नवीन गणवेश दिसणार
- कर्मचाऱ्यांना बंद गळ्याचा सूट ऐवजी गुलाबी रंगाच्या नेहरू जॅकेट आणि खाकी पॅट परिधान करावी लागणार आहे... या जॅकेटवर कमळाची फुल असतील
- संसदेतील मार्शलच्या नवीन पोषाखात आता मणिपूरी पगडीचा समावेश करण्यात आलाय... तर संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निळ्या रंगाच्या सूटची जागा आता सेनेच्या पोषाखात असेल
विशेष अधिवेशनात काय होण्याची शक्यता:
- महिला आरक्षण विधेयक येण्याची शक्यता
- जी 20 च्या यशस्वी आयोजनासाठी मोदींचं कौतूक
- चंद्रयान आणि सुर्ययान मोहिमेत भारताने मिळवलेल्या यशाबाबत पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करणार
- जम्मू कश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले यावर चर्चा
- चीन प्रश्नी काँग्रेसनं उपस्थित केलेल्या मुद्यावर चर्चा होणार
- रोहिणी आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या जाऊ शकतात
- मराठा आरक्षणावर महाराष्ट्रातील सर्वपक्षिय खासदार आक्रमक भूमिका घेऊ शकतात
- विरोधक जात निहाय जनगणेची मागणी करणार
- शेतकऱ्यांच्या एमएसपीचा मुद्दा, मणिपूर, भारत इंडिया वाद यासह इतर महत्वाच्या मुद्यावर विरोधक आक्रमक रहाणार
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.