UP Elections: ज्याचं हस्तिनापूर, त्याचचं उत्तरप्रदेश; यावेळीसुद्धा इतिहास कायम राहणार?

हस्तिनापूर मतदारसंघाचा आगळावेगळा इतिहास
UP Assembly
UP AssemblySaam Tv

सोनाली शिंदे (लखनऊ)

उत्तर प्रदेश: हस्तिनापूर मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार जिंकतो, राज्यात त्याच पक्षाचं सरकार येतं, असा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे यावेळी विद्यमान भाजप आमदार निवडून येतात की सपा-रालोद आघाडीचा उमेदवार याकडे सर्वांना नजरा लागल्या आहेत.

उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर (Hastinapur) हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. यावेळी तिथून निवडणून आलेले विद्यमान आमदार दिनेश खटीक हे योगी सरकारमधील (Yogi Government) मंत्री आहेत. त्यांच्याविरोधा यावेळी सपा-रालोद आघाडीने गेल्यावेळी बसपातून निवडणूक लढवलेल्या उमेदवाराला तिकिट दिलंय. त्यात काँग्रेसने (Congress) बिकनी गर्ल अर्चना गौतम हिला तिकीट दिल्याने सपा-रालोदच्या मतांची विभागणीही होऊ शकते. त्यामुळे हस्तीनापूर विधानसभेच्या महाभारताकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

UP Assembly
'बिकनी गर्ल' मुळे हस्तीनापूर मतदारसंघ चर्चेत, काँग्रेसकडून अर्चना गौतमला उमेदवारी

एवढचं नाही तर या जागेवर आणखी दोन इतिहासही आहेत. एक इतिहास म्हणजे इथे कोणताही आमदार सलग दोनदा निवडून आलेला नाही. दुसरा म्हणजे इथे जे आमदार बनून मंत्री झाले त्यांचं सरकारही पुढच्या वेळी टिकलेलं नाही. असा रंजक इतिहास असणाऱ्या हस्तिनापुरात कोण गादीवर विराजमान होणार, हे उत्सुकतेचं आहे.

हे देखील पहा;

काय आहे हस्तिनापूर आणि उत्तरप्रदेश सरकारचा इतिहास?

-1957-67 हस्तिनापूरमध्ये काँग्रेस विजयी, राज्यात काँग्रेसचं सरकार

-1974,1980,1985 हस्तिनापूरमध्ये काँग्रेस विजयी, राज्यात काँग्रेसचं सरकार

-2002 हस्तिनापूरमध्ये सपा विजयी, राज्यात सपाच्या मुलायमसिंहांचं सरकार

-2007 बसपाचे उमेदवार जिंकले, राज्यात मायावतींचं सरकार

-2012 ला सपाचा उमेदवार जिंकला, राज्यात अखिलेशचं सरकार

-2017 ला भाजपचे दिनेश खटीक विजयी, राज्यात भाजपचं सरकार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com