मस्तच! पेन्शन धारकांना Whatsapp वर मिळणार पेन्शन स्लिप

देशातील पेन्शन धारकांना Pensioners आता आणखी एका नव्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. व्हॉट्सॲपवर whatsapp पेन्शनची स्लिप आता मिळू शकेल.
मस्तच! पेन्शन धारकांना Whatsapp वर मिळणार पेन्शन स्लिप
मस्तच! पेन्शन धारकांना Whatsapp वर मिळणार पेन्शन स्लिपSaam Tv News

देशातील पेन्शन धारकांना Pensioners आता आणखी एका नव्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. व्हॉट्सॲपवर whatsapp पेन्शनची स्लिप आता मिळू शकेल. याअगोदर एसएमएस SMSआणि ई - मेलच्या E - mail माध्यामातून पेंन्शन धारकांना पेन्शन स्लिप पाठवण्यात येत होती. आता मात्र व्हॉट्सॲप सारख्या सोशल मीडिया social media app ॲपवरही पेन्शन स्लिप pension slip पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे देशातल्या लाखो पेंन्शन धारकांना याचा लाभ होणार आहे. Pensioners will get pension slip on Whatsapp

हे देखील पहा -

मागील महिन्यात दिल्ली येथे सेंट्रल पेन्शन अकाऊंटींग ऑफिस Central Pension Accounting Office या संस्थेची बैठक झाली होती. या बैठकीत लोकांसाठी कल्याणकारी योजनांवर चर्चा झाली. केंद्रीय पेन्शन वितरण केंद्राच्या CPPC या बैठकीत पेन्शन धारकांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर पेन्शन स्लिप पाठवण्यात यावी असे आदेश पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांना देण्यात आले. त्यामुळे पेन्शन धारकांसाठी हे सोयीस्कर ठरणार आहे. यात पेन्शन धारकाला त्याच्या खात्यातील रक्कम, व्यवहार अशा प्रकारची सर्व माहिती मिळणार आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com