श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये आर्थिक आणीबाणी; सामान खरेदीसाठी थेट भारतीय बाजारपेठेत

श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये सतत परकीय चलन निधी कमी होत असल्याने समस्या वाढत आहेत.
श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये आर्थिक आणीबाणी; सामान खरेदीसाठी थेट भारतीय बाजारपेठेत
Financial emergency in Nepal, Nepal latest Marathi newsSaam TV

श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये सतत परकीय चलन निधी कमी होत असल्याने समस्या वाढत आहेत. नेपाळ सरकारने 10 लक्झरी वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. मोहरीच्या तेलासह जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. त्यामुळे नेपाळ सीमेला लागून असलेला जोगबनी बाजारात लोकांचा ओढा वाढत आहे. लोक भारतीय बाजारातून वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. विदेशी मद्य, अगरबत्ती, डिझेल आणि पेट्रोल वाहने, 250 सीसीच्या बाईक, चिप्स, क्रिस्प्स, डायमंड, 600 डॉलरपेक्षा जास्त किंमतीचे मोबाइल फोन, खेळणी, कार्ड्स, 32 इंचांपेक्षा जास्त असलेले टीव्ही इत्यादींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. (Financial emergency in Nepal)

Financial emergency in Nepal, Nepal latest Marathi news
राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? मुंबई सत्र न्यायालयाकडून नोटीस जारी

नेपाळ सरकारच्या आयात निर्यात कायदा 2013 च्या कलम 3 अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून, अनेक गोष्टींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ सरकारने लादलेली आयात बंदी चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत लागू राहिल. यासंदर्भात भारतातील जोगबानी येथे पोहोचलेल्या ज्योती थापा यांच्या म्हणण्यानुसार, नेपाळमध्ये चैनीच्या वस्तूंसोबतच दैनंदिन वापराच्या वस्तूही महागल्या आहेत. यासाठी आम्ही जोगबनी येथे येऊन या वस्तूंची खरेदी करत आहोत.

प्रवासात सुमारे पाचशे रुपये खर्च करूनही येथे खरेदी करणे स्वस्त असल्याचे त्यांनी सांगितले. इथून एकदा महिनाभराचा माल घेतला तर खूप फायदा होतो. येथे तांदूळ, डाळी, साखर इत्यादी दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी भारतातूनच आणल्या जातात. रेणुका दहल सांगतात की, जोगबनी मार्केटमधूनच खरेदी करणे ही त्यांची मजबुरी आहे, इथे सर्व वस्तू चांगल्या आणि स्वस्त मिळतात. इथे तांदूळ अगदी स्वस्तात मिळतो.

सुभाष गुरुंग म्हणतात की नेपाळमधील परिस्थितीबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. सर्वच वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नेपाळी दुकानदार मनमानी दर आकारत असल्याने लोक सर्व काही जोगबनीतून खरेदी करत आहेत.

नेपाळमध्ये सुरु असलेल्या गोष्टींची माहिती घेत भारत नेपाळ सामाजिक सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष राजेश कुमार शर्मा म्हणाले की, रमजाननंतर आता लग्नसराईमुळे भारतीय बाजारपेठेत गर्दी होत आहे. भविष्यात त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होणार आहे. नेपाळमधील 90 टक्के बाजारपेठ एकट्या भारतीय ऑटोमोबाईल कंपनीकडे आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.