Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात घट? झटपट चेक करा इंधनाचे दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaamTV

Petrol Diesel News : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल दिसून येत आहेत. 

देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दारात बदल करण्यात आला आहे. मात्र, असे असेल तर दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.  (Latest Marathi News)

Petrol Diesel Price
Accident News : मोठी बातमी! मुंबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात; गर्भवती महिलेसह 6 प्रवाशी जखमी

राजस्थानमध्ये पेट्रोल 0.96 पैशांनी घसरल्यानंतर 108.07 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. येथे डिझेल 0.87 पैशांनी कमी होऊन 93.35 रुपये झाले आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल (Petrol) 0.41 पैशांनी 96.36 रुपये आणि डिझेल डिझेल (Diesel) 0.40 पैशांनी स्वस्त होऊन 89.53 रुपये झाले आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. दुसरीकडे बिहारमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 0.36 पैशांनी वाढ झाली आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि मध्य प्रदेशमध्ये इंधनाच्या दरात वाढ होत आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price
Vladimir Putin : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; १२३ देशात होऊ शकते अटक; पण...

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com