Petrol Diesel: आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा, तुमच्या शहरातील इंधनाचे नवीनतम दर तपासा

71 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diese Price
Petrol Diese PriceSaam Tv

नवी दिल्ली - आज सकाळी 6 वाजता, तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. यासह सलग 75 दिवस पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अजूनही खाली येत आहेत आणि ब्रेंट क्रूड आज 95 डॉलरच्या खाली घसरले आहे. मात्र, त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर होताना दिसत नाही.

WTI क्रूडच्या किंमती 88.53 प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूडच्या किंमती 94.09 प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती सतत चढ-उतार होत आहे. मात्र, देशाबद्दल बोलायचे झाले तर आजही दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

हे देखील पाहा -

केंद्रातील मोदी सरकारने गेल्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, त्यानंतर अनेक राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला, त्यानंतर या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या.

महाराष्ट्रात व्हॅट कपातीची घोषणा

नुकतीच महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती, त्यानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपयांनी आणि डिझेलवर 3 रुपयांनी कपात केली.

दिल्ली, मुंबईसह चार प्रमुख महानगरांमध्ये इंधनाचे दर

दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 276 रुपये प्रति लिटर

Petrol Diese Price
Latur: मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस; लाखो हेक्टरवरील पिके गेली वाहून

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबई शहरात पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

बृहन्मुंबईमध्ये पेट्रोल 106.49 रुपये आणि डिझेल 94.44 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोल 105.99 रुपये आणि डिझेल 92.51 रुपये प्रति लिटर.

नाशिकमध्ये पेट्रोल 106.22 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.73 रुपये प्रतिलिटर

नागपुरात पेट्रोल 106.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर

कोल्हापुरात पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com