Petrol Diesel Price : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर घसरले; चेक करा आजचे इंधनाचे दर

आज पेट्रोल 96.44 रुपये प्रति लिटर झाले आहे. तसेच डिझेलची किंमत आज 89.62 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv

Petrol Diesel Price :जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. ब्रेंट क्रूड आज $73 च्या घरात पोहोचले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरानुसार आज देखील किमतींमध्ये किरकोळ बदल झाला आहे. एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती घसरल्या आहेत. मात्र दिल्ली-मुंबईसारख्या शहरांवर याचा परिणाम झालेला नाही. या दोन्ही शहरांमधील दर आद्याप स्थिर आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे पेट्रोलच्या किंमती २४ पैशांनी स्वस्त झाल्या असून सध्या ९६.७६ रुपये प्रति लीटर दर आहे. तसेच डिझेलच्या किंमती २१ पैशांनी घसरल्या आहेत. आज डिझेलची किंमत ८९.९३ रुपये प्रति लीटर झाली आहे.

Petrol Diesel Prices
Jalna Crime : फ्री फायर गेमवरून दोन गटात वाद; चाकू-खंजीरने एकमेकांवर वार, ७ जण गंभीर जखमी

गाझियाबादमध्ये पेट्रोलच्या किंमतीत घसरण झाल्याच पहायला मिळत आहे. आज पेट्रोल 96.44 रुपये प्रति लिटर झाले आहे. तसेच डिझेलची किंमत आज 89.62 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
Satara Crime News : पाटण गाेळीबार प्रकरणी ठाण्याचा माजी नगरसेवक पाेलिसांच्या ताब्यात, कारण आलं समाेर (पाहा व्हिडिओ)

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com