PetrolPrice : तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल स्वस्त; केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय
PetrolPrice : तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल स्वस्त; केजरीवाल सरकारचा मोठा निर्णयSaamTV

PetrolPrice : तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल स्वस्त; केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

पेट्रोलवरील व्हॅट 30% वरून 19.40% पर्यंत कमी केला आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत सध्याच्या 103.97 रुपयांवरून 95.97 रुपयांपर्यंत खाली येणार आहेत.

संतोष शाळिग्राम -

नवी दिल्ली : राज्यासह संपुर्ण देशाला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी (Petrol and Diesel Price) हैराण केलं आहे. रोजच इंधन दरांमध्ये वाढ होण्याच्या बातम्या आपण वाचत असतो मात्र त्याच किंमती कमी केल्याच्या बातम्या आपण क्वचित पाहतो. आणि आणि दर कपात केलीच तर ती काही पैशांमध्ये असते. मात्र आज दिल्लीकरांना मात्र पेट्रोल दरांमध्ये मोठी दर कपात मिळाली आहे कारण दिल्लीत आज तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल (Petrol) स्वस्त करण्यात आलं आहे.

हे देखील पहा -

पेट्रोलच्या दरात आज वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेत दिल्लीतील जनतेला दिलासा दिला आहे. दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी सरकारने राज्यात व्हॅट कमी केला आहे.

PetrolPrice : तब्बल 8 रुपयांनी पेट्रोल स्वस्त; केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय
''ओमायक्रॉन'च काय WHO चे डॉक्टर देखील फर्जी; कोरोनाच्या नावाखाली लोकांचे अवयव विकले''

महाराष्ट्रात स्वस्ताई कधी -

दिल्ली सरकारने (Delhi Goverment) पेट्रोलवरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) 30% वरून 19.40% पर्यंत कमी केला आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत सध्याच्या 103.97 रुपयांवरून 95.97 रुपयांपर्यंत खाली येईल. दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT on Petrol and Diesel) कमी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. दरम्यान आता दिल्ली सरकारणे केले महाराष्ट्रात इंधनांच्या दरांमध्ये कपात कधी?? असा प्रश्न राज्यातील जनता विचारत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com