पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

शुक्रवारीही पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही
पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव
Petrol Diesel PriceSaamTV

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या (Crud Oil) किंमतीत वाढ होत असतानाच, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल डिझेलचे दर जारी केले आहेत. शुक्रवारीही पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून तेलाचे दर स्थिर आहेत. (Petrol Diesel Latest Price Today)

Petrol Diesel Price
Viral Video : जखमी गरुडाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्देवी अपघात; दोघांचा मृत्यू

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरेल 120 डॉलरच्या वर आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर कच्चा तेलाचे दर 120 डॉलरच्या खाली आले नाही तर, पेट्रोल डिझेल पुन्हा महाग होऊ शकते. वाढत्या कच्चा तेलांच्या किंमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आज दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

शुक्रवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.

Petrol Diesel Price
राष्ट्रपती निवडणुकीवर मुंबईत खलबते; शरद पवार व मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बैठक

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com