Petrol Diesel: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या आजचा भाव

प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घ्या
Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates
Petrol Diesel Latest Price, Fuel Price updatesSaam TV

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी घसरण झाली आहे. असे असतानाही तीन महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel) दर समान पातळीवर आहेत. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांतील तेलाच्या किंमतीत तीन महिन्यांपूर्वी बदल करण्यात आला होता. त्यावेळी केंद्र सरकारने तेलाच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला होता.

मेघालयात गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर दीड रुपयांनी वाढले आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. पुन्हा एकदा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली गेली आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 87.67 डॉलरवर पोहोचली आहे. त्याच वेळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 93.49 डॉलरवर आहे.

यापूर्वी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला.

हे देखील पाहा -

आजचे भाव काय आहेत?

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates
मिट्ट काळोख आणि शेतात वासरे दावणीला; अचानक....

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com