Petrol Diesel: गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? मग आधी पेट्रोल-डिझेलचे दर नक्की तपासा

जाणून घ्या प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. ब्रेंट क्रूड तेल सध्या प्रति बॅरल 91डॉलरच्या आसपास आहे. मात्र त्यानंतरही देशातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. भर रस्त्यात

ब्रेंट क्रूड तेल सध्या प्रति बॅरल 91 डॉलरच्या आसपास आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 80.85 डॉलर पर्यंत जाऊ शकतात. या गुणोत्तराच्या आधारे तेल कंपन्यांनी दर कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

हे देखील पाहा -

आजचे भाव काय आहेत?

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
'शेतकऱ्यासारखा जुगार कोणी खेळत नाही; पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com