Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात घसरण; पेट्रोल-डिझेल होणार आणखी स्वस्त?

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Prices Today
Petrol Diesel Prices TodaySaam TV

नवी दिल्ली - जागतिक बाजारात, गेल्या २४ तासांत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे एक डॉलरने घसरल्या आहेत, ज्याचा परिणाम बुधवारी सकाळी देशांतर्गत बाजारातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ किमतींवरही झाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जारी केलेल्या दरात यूपीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत, मात्र बिहारमध्ये किमतीत घट दिसून येत आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 16 पैशांनी महागले असून येथे पेट्रोल 97.00 रुपये प्रति लिटर लिटरवर पोहोचले आहेत. दुसरीकडे, बिहारची राजधानी पाटणामध्ये आज पेट्रोलच्या दरात 53 पैशांनी घट झाली असून नवीन दर 107.59 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत, तर डिझेल 50 पैशांनी स्वस्त होऊन 94.36 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

Petrol Diesel Prices Today
Nanded Crime : विवाहित महिलेला हॉटेलवर घेऊन गेला; तरुणासोबत घडली भयंकर घटना

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com