Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? जाणून घ्या आजचे दर

6 एप्रिलपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price TodaySaam TV

नवी दिल्ली - सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) दरातील दिलासा कायम ठेवला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मोदी सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रात व्हॅट कपातीची घोषणा

नुकतीच महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती, त्यानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपयांनी आणि डिझेलवर 3 रुपयांनी कपात केली.

आजचे भाव काय आहेत?

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today
मंकीपॉक्स प्रकरणी WHO ची मोठी घोषणा! मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com